शेवगा शेंगाचे
आरोग्यदायी फायदे (drumstick )
सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोक फक्त स्वतःची इम्युनिटी
स्ट्रॉंग कशी होईल याकडे लक्ष देत आहेत. खऱ्या अर्थाने तर शरीराच्या
तंदुरुस्तीच महत्व आता जास्तच पटू लागले आहे. त्यामुळे लोक अधिक
प्रमाणात शारीरिक क्षमता व रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या नैसर्गिक
घटकाकडे वळू
लागले आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकांमधील महत्वपूर्ण घटक म्हणजे
'शेवगा'. हे झाड अतिशय ठिसूळ आणि कमकुवत असले तरी याच्या प्रत्येक
घटकाचा चमत्कारी उपयोग होऊ शकतो.
![]() |
शेवगा शेंगाचे आरोग्यदायी फायदे |
चला तर मग
आपण पाहुयात शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे :
Table of contents
२. शेवग्याचे आरोग्यदायी गुणधर्म
शेवग्याच्या शेंगाचे फायदे
१. शेवग्याच्या झाडाची कोवळी पाने आणि फुले व शेंगाची भाजी
करतात.
२. आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या शेंगाचे फायदे सांगितले आहेत. शेवग्याच्या
शेंगांमध्ये पोषक अन्नघटक लोह, बीटा, कॅरोटीन, कॅल्शियम, अमिनो ऍसिड,
मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन अ, ब, क यांसारखी
जीवनसत्वे आहेत.
३. ही सर्व जीवनसत्व शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच
शरीरातील अनेक शारीरिक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत.
कच्चा कांदा खाण्याचे फायदे सौदर्य आणि आरोग्यासाठी लाभदायक
शेवग्याचे आरोग्यदायी गुणधर्म
१. शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा
वापर फायदेशीर ठरतो. शेवग्याच्या पानाची भाजी आपण रक्तवाढीसाठी खाऊ
शकतो. यामध्ये पालकभाजीपेक्षा ३ पटीने अधिक लोहाचे प्रमाण असते.
२. शेवग्याची पाने शरीरातील ऊर्जेचा स्रोत वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
तसेच अल्सर, ट्युमरवर नियंत्रण सांधेदुखी, शरीरावरील अनावश्यक सूज
कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात
ठेवण्यासाठी शेवगा हमखास फायदेशीर
ठरतो.
३. वरील सर्व गोष्टीप्रमाणे शेवग्याच्या झाडाच्या पानांप्रमाणे शेंगाही अत्यंत
फायदेशीर ठरतात. यामध्ये रक्त शुद्धीकरणाची क्षमता असते. रक्तातील
अनावश्यक दूषित घटक वाढल्यामुळे होणारा त्रास त्वचेचे समस्या दूर
करण्यासाठी शेवग्याचा शेंगा फायदेशीर ठरतात. शेवग्याचा शेंगामध्ये
असणाऱ्या व्हिटॅमिन सत्वामुळे त्वचेवर आलेले पांढरे चट्टे नाहीसे होतात. व
ज्यांना त्वचेवर चट्टे येत नाहीत अशांना शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे
उठण्याची भीती पण नाही.
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
४. घशातील खवखव, सर्दी, कफ, श्वास घेताना होणार त्रास शेवग्याच्या
शेंगाच्या सुपमुळे बरे होते. या सूपमध्ये पोषण तत्व श्वसन मार्गातील घटक
कमी करण्यास मदत करतात. शेवग्याच्या शेंगाच्या सूपमध्ये शेवग्याचा पूर्ण
अर्क उतरते त्यामुळे त्यातील सगळे पौष्टिक घटक उतरतात. ते आपल्या
शरीराला उत्तम फायदेशीर ठरतात. अस्थमा, टी बी सारख्या आजारावर शेवगा
उपयुक्त ठरतो.
५. शेवग्याच्या शेंगामुळे रक्तामधील साखर नियंत्रित राखण्यासाठी मदत होते
परिणामी मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते त्यामुळे पित्ताशयाचे कार्यही
सुरळीत चालू राहते.
६. शेवग्याच्या शेंगा किंवा पाल्याची भाजी खाल्ल्यामुळे डोळ्यांची दृष्टी
वाढवण्यास व कोलेस्ट्रॉल कमी होण्यास देखील मदत होते.
७. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे लठ्ठपणा देखील कमी होतो. वजन
वाढण्यास प्रतिबंध करतात.
८. आपल्या मेंदूच्या संबंधित म्हणजेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी शेवग्याच्या
शेंगा उपयुक्त ठरतात.
९. लग्नानंतर महिला / पुरुषाच्या शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी शेवगा
उपयुक्त ठरतो.
१०. कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व अनेक धोकादायक
संसर्गजन्य आजारापाजून संरक्षण होण्यासाठी शेवग्याच्या शेंगा उपयुक्त
ठरतात.
शेवग्याच्या पानाची पावडर
१. डाळीचे वडे, दुधातून मिश्रण, भाजी पराठे यासोबत शेवग्याच्या पानाचा
पावडरीचा
वापर करू शकता.
२. मध, पापड, सॅलड निर्मितीमध्ये सुद्धा याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला
जातो.
शेवगा पावडरमधील घटक
१. जीवनसत्व इ चे प्रमाण पालकांपेक्षा ३ पटीने जास्त
२. जीवनसत्व अ चे प्रमाण गाजरापेक्षा ४ पटीने जास्त
३. कॅल्शियमचे प्रमाण दुधापेक्षा ४ पटीने जास्त
४. जीवनसत्व अ चे प्रमाण संत्रीपेक्षा ४ पटीने जास्त
५. लोहाचे प्रमाण बदामापेक्षा ३ पटीने जास्त
आले खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि नुकसान (Benefits of jinjer and disadvantages)
शेवग्याच्या पानांचा चहा
१. प्रथम शेवग्याची पाने स्वछ धुऊन सावलीत वाळवावी. वाळलेली पाने
चहापूडप्रमाणे बारीक करून घ्यावी.
२. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यामध्ये शेवग्याची पावडर व चवीपुरती
साखर मिसळावी. तर तयार झालेला शेवग्याचा चहा कपात ओतावा आणि
त्यामध्ये लिंबाचे ५ ते ६ थेंब मिक्स करून घ्यावा. अशा प्रकारे तयार
झालेला शेवग्याचा चहा अत्यंत गुणकारी व आरोग्यदायी असतो व चवीलाही
अत्यंत चांगला
लागतो.
अशा प्रकारे आपण शेवग्याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात करू
शकता.
शेवग्याच्या शेंगाचे सूप
अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत आवर्जून पिणारे चविष्ट आणि
पौष्टीक शेवग्याच्या शेंगाचे सूप
१.
प्रथम ६ ते ८ शेवग्याच्या
शेंगा घ्या.
२.
ते स्वच्छ धुऊन त्याचे समान आकारात तुकडे करून
घ्या.
३. त्यासोबत अर्धी वाटी मुगडाळ स्वच्छ धुऊन शेवग्याच्या शेंगासोबत
कुकरला ४ ते ५ शिट्या देऊन
शिजवून घ्या.
४.
शेंगा शिजल्यावर त्याचा सर्व गाभा बाऊलमध्ये
काढून घ्या.
५. त्यानंतर अर्धी वाटी ओल्या नारळासोबत २ ते ३ आल्याचे तुकडे, ४ ते ५
लसणीच्या पाकळ्या, जिरे, ७ ते ८ काळी मिरे भांड्यामध्ये पाणी घालून
बारीक पेस्ट
करून घ्या.
६. त्यांनतर गॅसवर एका पॅनमध्ये २ चमचे तूप घाला. तूप गरम झाले कि
त्यात थोडे मोहरीचे दाणे टाका. तडतडली की त्यात जिरे त्यांनतर
कडीपत्ता, थोडेसे तीळ, हळद, हिंग पावडर घालून परतून घ्या.
७. परतून झाल्यावर त्यात ओल्या नारळाची केलेली पेस्ट घालून ५ ते ६
मिनिटापर्यंत परतून घ्या. परतून झाल्यावर शेवग्याच्या शेंगाचे पेस्ट घालून
परतून घ्या.
८. हे सर्व परतून झाल्यावर शेंगा शिजवलेले पाणी आपल्या आवडीनुसार
त्यात घट्ट व पातळ प्रमाणात ठेऊ शकता.
९. सूप तयार झाल्यावर त्यात चवीपुरते मीठ घाला व वरून बारीक चिरलेली
कोथिंबिरी घाला. मग आपलं गरमागरम सूप सर्व्ह करण्यासाठी तयार
आहे.
अगदी चविष्ट आणि पौष्टिक सूप तयार होते व ते सर्वांसाठी खूपच
हेल्दी आहे. नक्की ट्राय करा.
पावसाळ्यात व थंडीच्या दिवसात अगदी उत्तम अशी ही रेसिपी
आहे.
निष्कर्ष -
यातून असे दिसून आले कि शेवग्याच्या शेंगा खूपच
आरोग्यासाठी हितकारक आणि लाभदायक आहेत. यामध्ये आरोग्यासाठी
बरेच गुणधर्म आहेत. तसेच आपण पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात
शेंगाचे
सूप चविष्ट आणि आरोग्यवर्धक म्हणून पिऊ शकतो.
If you have any doubts, please let me know.