ज्ञानरूपी प्रकाशा
या अंधकाला प्रकाशुन टाक
तुच या दिन-दुबळ्याचा
सखा होवून वात तेव
तूच सगळ्यांचा नेत्र
न मालवणारा माता-पिता
असा न आहेस तू
भोळ्या-भाबड्यास लुबाड़नारा
नित्य तुझे करितोच काम
जोपर्यंत उजेडाला नशीबाची साथ
तुझी ज्योत किती शांत तेवते
ही वळण या जगास लागावी
तुझ्याकडे पाहुनी मज वाटे
मी होऊनी गेलो दिव्यज्योत
तुझ्या या दिव्यमय ज्योतीने
होऊनी जावे जग तेजोमय
अशी तुझी कीर्ती राहो
तुला अखंड आयुष्य लाभो
हीच माझी तळमळीची प्रार्थना।
गणेश साळुंखे
If you have any doubts, please let me know.