कच्चा कांदा खाण्याचे फायदे सौदर्य आणि आरोग्यासाठी लाभदायक
जगभरातील आहारामध्ये कांद्याच्या फोडणीशिवाय भाज्या विविध
रेसिपीज बनणं अशक्यच. साध्या चटणी भाकरी सोबत टेस्ट
आणणारी गोष्ट म्हणजे कांदा.
कांद्याशिवाय कुठल्याही पदार्थाला चवच येत नाही. अनेकांना रोजच्या
जेवणात कांदा हा लागतोच. फार पूर्वीपासून आपल्या महाराष्ट्रीयन
जेवणामध्ये जेवताना कच्चा कांदा खायला दिला जातो.
पण कांदा खाल्याने नेमके काय होते हे अनेकांना माहीतच नसते. तर
त्याविषयी आपण माहिती करून घेवू.
कांद्यामध्ये असे काही गुणधर्म असतात ते आपल्या शरीरासाठी
अत्यंत फायदेशीर असतात त्यामध्ये अँटी आक्सिडेंट, व्हिटॅमिन A ,
व्हिटॅमिन B6, अँटी ऍलर्जिक, व्हिटॅमिन c , सल्फहार फ्लेवोनॉइड,
आयरन, फायबर फोलेट आणि पोटॅशियम इत्यादी सर्व महत्वाचे
पोषक घटक समाविष्ठ असतात.
आपल्या भारतात कांद्याला कृष्णावळ असंही म्हणतात. कारण कांदा
आडवा चिरला तर शंखाकृती दिसतो. शंख आणि चक्र हे श्री
कृष्णाची शस्त्रे असल्यामुळे कांदयाला कृष्णावळ म्हटले जाते. एवढंच
नाही तर आपल्या भारतीय खादय संस्कृतीत कांदयाला महत्वाचे
स्थान आहे. कांदा खोबऱ्याच्या वाटनाशिवाय भारतीय जेवण
अपूर्णच.
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
कांदा चिरताना जरी आपल्या डोळ्यातून पाणी येत असलं तरी तो
आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कांदा आरोग्याप्रमाणे
केसांसाठी आणि
त्वचेसाठीहि औषधीय आहे.
भारतात कांदे लाल आणि पांढऱ्या अशा दोन प्रकारचे मिळतात.
दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
तर जाणून घेऊयात कांदा आपल्या आरोग्य आणि केस व त्वचेवर
कसा
फायदेशीर ठरतो.
Table of Contents
१. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवते.(improve immune system)
८. रक्तातील साखर नियंत्रित करते.
१०. हाडांची मजबुती टिकून राहते.
१३. केसांमधील कोंडा नाहीसा होतो.
१४. कांदा खाण्याच्या उपायांबाबत प्रश्न.
![]() |
benefits of onion |
आले खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि नुकसान (Benefits of jinjer and disadvantages)
१. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवते.(improve immune system)
कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमुळे सध्या शरीरातील
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे महत्व समजले आहे. बाहेरच्या
व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी आणि आजारपण
टाळण्यासाठी इम्युनिटी सिस्टीम मजबूत असणे आवश्यक आहे.
कांद्यामध्ये सेलेनियम घटक भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे
आपली इम्युनिटी सिस्टीम वाढवण्यासाठी मदत करते. अशा या
व्हायरल आजारापासून दूर राहण्यासाठी कांद्याचा समावेश आपण
आपल्या आहारामध्ये केलाच पाहिजे. कांद्याच्या सेवनामुळे शरीर
निर्जंतुक राहतेच याशिवाय शरीर डिहायड्रेट राहण्यासाठी मदत होते.
सध्या सर्दी खोकला झाला तरी त्यावर उपचार म्हणून कांद्याचा
रसाचा काढा घेऊ शकता. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते व
सर्दी खोकला लवकर बरा होतो.
२. शरीराचा दाह कमी होतो.
कांदा हा थंड पदार्थ असल्यामुळे आपल्या शरीरातील दाह
कमी होण्यासाठी याचे सेवन करणे चांगलेच ठरते. कांद्यामध्ये
नैसर्गिक अँटी इंफ्लामेंट्री गुणधर्म असतात. कधीकधी आपल्या
आरोग्य समस्या किंवा अलर्जीमध्ये शरीरातील पेशींवर परिणाम
झाल्यामुळे दाह जाणवतो. कांदा शरीराला थंडावा देतो. कांद्याच्या
सेवनामध्ये आपल्या शरीरातील सायनस आणि टॉक्सिन्स बाहेर
टाकले जातात. रात्रीच्या जेवणामध्ये कच्च्या कांद्याचे सेवन
केल्यास कफाचा त्रास कमी होतो आणि शरीराला आराम मिळतो.
कांद्यामध्ये अँटीबॅक्टरील गुणधर्म असल्यामुळे आपल्या दातांच्या
समस्येवरही चांगला परिणाम करतात. जखमा भरून काढण्यासाठी
आणि शरीर नियमित थंड ठेवण्यासाठी नियमित कांदा खाणं
आपल्या फायद्याचं ठरू शकतं.
३. श्वसन प्रक्रिया सुधारते.
श्वसन प्रक्रिया सुरळीत तर सगळी शरीरातील प्रक्रिया
सुरळीत चालू राहते. या कोव्हिडच्या काळादरम्यान श्वसन संस्था
निरोगी राखणे खूप गरजेचं आहे. कारण जर तुमची श्वसन संस्था
कमकुवत असेल तर तुम्हाला बाहेरील इन्फेक्शन चा त्रास लवकर
होऊ शकतो. जर अस्थमासारखे आजार असतील तर आपल्याला
श्वसन संस्थेची काळजी घ्यायला हवी. यासाठी आपल्या आहारात
कांद्याचा समावेश असायला पाहिजे कांद्याच्या सेवनामुळे
श्वसनमार्ग नेहमी निरोगी राहते. कच्चा कांद्याच्या सेवनामुळे किंवा
सॅलडमध्ये कांदा
खाल्यामुळे आपले आरोग्य नक्कीच सुरळीत राहील.
वेलची (वेलदोडे) खाण्याचे फायदे
४. सेक्स लाईफ सुधारते.
सेक्स लाईफ उत्तम राहण्यासाठी कांद्याचे सेवन करणे उत्तम
राहील. कांद्यामुळे सेक्स प्रॉब्लेम्स नाहीसे होतात व सेक्स लाईफ
चांगली होऊ शकते. कांदा हा एक आयुर्वेदिक औषध आहे. काही
काही देशामध्ये तर कांद्याचा वापर सेक्शुअल समस्यांवर उपचार
म्हणून केला जातो. पुरुषांमधील नपुसंकता किंवा इतर खाजगी
शारीरिक समस्या कांद्याच्या सेवनामुळे कमी होऊ शकतात. कांदा
खाल्ल्यामुळे पुरुषांमधील सेक्सलाईफ चांगली राहते. काहींना
वंध्यत्वाची समस्या असते त्यांच्यासाठी सुद्धा कांद्याचे सेवन करणे
फायद्याचे ठरू शकते. काही काही पुरुषांना प्रजननाबाबत समस्या
असते त्यांनी नियमित कांद्याचा रस मधातुन घ्यावा.
५. पांढरे केस काळे होतात.
डॉंक्टरांच्या मतानुसार, कांदा हा हेअरफॉल साठी व केस
काळे राहण्यासाठी उत्तम आहे केसांच्या फायद्यासाठी कांद्याचा
तेलामध्ये रूपांतर करून लावायचा सल्ला देतात. कांद्यामुळे
केसगळती तर थांबतेच व पांढरे केस काळे होण्यासाठी पण मदत
होते. ज्या लोकांना टक्कल पडत आहे व डोक्यावरील केस कमी होत
चालले आहे त्यांनी सुद्धा कांद्याच्या तेलाचा नियमित केसावर
वापर करू शकता. कांद्याचे सेवनही करू शकता. वयानुसार केस
पांढरे होतच असतात तरी आजकाल वयाआधीच तरुण तरुणींचे केस
पांढरे होताना दिसतात. याचे काय कारण असेल नक्की? त्यांच्या
शरीरात केसांसाठी असणारे पोषक घटक मिळत नसणार म्हणून
त्यांना अशा समस्येतून जावे लागते. तर या समस्येवर तुम्ही
कांद्याने सहजरित्या उपचार करू शकता. कांद्याचे नियमित सेवनही
करत जावा व
कांद्याचे तेल केसांसाठी वापरत जावा.
कांद्याचे तेल बाजारातही उपलब्ध आहेत व आपण ते घरीही
उत्तमरीत्या बनवु शकतो.
६. केसांची वाढ उत्तम होते.
शारीरिक सौन्दर्यासोबतच केसांचे सौन्दर्य टिकून ठेवणेही
फार गरजेचे असते लांबसडक दाट केस असेल तर सौन्दर्य अधिक
खुलून दिसते. केसांची वाढ उत्तम राहण्यासाठी आपण कांदा वापरू
शकतो व कांद्याच्या सेवनाने केसांची वाढही उत्तम होते. कांद्यामध्ये
सल्फरचे प्रमाण अस्टिटंकेसांसाठी प्रोटीनसारखे काम करते केस
मजबूत ठेवण्यासाठी कांद्याचे रस नक्कीच फायदेशीर ठरू शकते तर
कांद्याचा रस आपल्या केसांचा मुळापाशी हलक्या हातानी मसाज
केरु शकता. कांद्यामधील सल्फर घटकामुळे केसांमधील कोलेजीनला
प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारून केस मजबूत
होतात. केसांना शाईन येते. कांद्याचे रस केसांना लावल्यामुळे
केसांचे फोलिकल्स मजबूत होतात. केस गळणे कमी
होते.
७. कानाच्या समस्येवर रामबाण.
कानाच्या समस्येवर प्राचीन काळापासून कांद्याच्या
रसाचा वापर केला जात होता. आत्ताच्या काळातही घरातील जुनी
जाणती माणसं कान दुखत असल्यास कानात कांद्याच्या रसाचा
घालण्याचा सल्ला देतात. खरतरं याबाबत स्वतःच्या बुद्धीने विचार
करून निर्णय घ्यायचा असतो म्हणजे कानदुखी नेमकी कशामुळे
होते हे तपासून उपचार करायला हवेत. तर कांद्याचा वापर आपण
योग्यरीत्या योग्यप्रमाणात केला पाहिजे. कांद्याचा रस गरम करून
कानात घातल्यामुळे आपले कानातील इन्फेक्शन कमी होते . मात्र
हा एक आपला घरगुती आयुर्वेदिक उपचाराचा घटक असल्यामुळे
याचा कसा व वापर ते आहे. तर कानाचे इन्फेक्शन कांद्याचे
रसामुळे
बरे होऊ शकतात.
८. रक्तातील साखर नियंत्रित करते.
आजकाल रक्त साखरेचे प्रमाण कमी जास्त
असल्यामुळे शुगरची संख्या जगभरात वाढलेली दिसते. शुगर हा
असा जीवनशैलीचा भाग होत चालला आहे की काही काही घरात
शुगरचे एक-दोन तरी पेशंट असतातच. शुगरच्या पेशंटनी त्यांच्या
आहारात साखरेचे प्रमाण तर कमी केले पाहिजेत. त्यासोबतच
कांद्याचेही नियमित सेवन केले पाहिजेत. कांद्यामुळे शुगरचे लेव्हल
नॉर्मल राहते व कांद्यातील सल्फरमुळे साखरेचे प्रमाण नियंत्रित
राहते. शुगरच्या पेशंटनी शुगरवरील गोळ्या ही नियमित चालू
ठेवल्या पाहिजेत.
९. पचनक्रिया सुधारते.
कांद्यामुळे आपली पचनक्रिया ही सुधारली जाऊ शकते.
कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरमुळे त्यांचा
चांगला परिणाम आपल्या पचनसंस्थेवर दिसून येतो कांद्यामधील
गुणकारी घटक आपल्या आतड्यामध्ये चांगले बॅक्टरीया निर्माण
करून आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन अतिशय चांगल्या प्रकारे
करतात. यासोबतच ज्यांना कांदा खाल्ल्याने त्रास होत असेल तर
त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन खाऊ शकता. कांदा खाल्ल्यामुळे
खाल्लेले अन्न लवकर विरघळते. व पचनही लवकर होते त्यामुळे
जेवताना कांदा खाणे उत्तम ठरू शकते. कांदा खाल्ल्यामुळे
आपल्याला डायरिया अथवा अपचनाच्या समस्येपासून दूर ठेवतो.
गॅसेसचा त्रासही कांद्यामुळे कमी होतो. कांदा हा नैसर्गिक
प्रोबायोटिक पदार्थ आहे. काहींना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर
त्यांनी नियमित कांद्याचे सेवन करू
शकता.
१०. हाडांची मजबुती टिकून राहते.
वाढत्या वयोमानानुसार प्रत्येक मानवजातीच्या
हाडांची झीज होत असते. त्यामुळे आपल्या हाडांच्या समस्या देखील
उदभवू लागतात. कांदा हा आपल्याला आपल्या वयोमानानुसार
होणाऱ्याहाडांच्या समस्येपासून दूर ठेऊ शकतो त्यामुळे सर्वांनी
आपल्या आहारात कांद्याचे समावेश केले पाहिजे. चाळिशीनंतर
विशेषतः महिलावर्गामध्ये हाडांची झीज जास्त प्रमाणावर होत असते.
मात्र ज्या महिला च्या आहारात कांद्याचे प्रमाण योग्य असते त्यांना
सांधेदुखीचा त्रास हळूहळू जाणवतो. काही महिला कांद्याचे सेवन
टाळतात तर त्यांना लवकरच अशा गुडघेदुखी सांधेदुखीच्या समस्या
जाणवू शकतात. आर्थोरायटिस सारख्या सांधेदुखीच्या दुखण्यावरही
कांदा हा उत्तम गुणकारी ठरतो. आपले हाडांच्या मजबुतीसाठी कांदा
खाणे खुपच फायदेशीर आहे.
११. ऍक्नेवर उपचार करण्यासाठी.
आपल्या आरोग्याप्रमाणे कांदा हा आपल्या
सौन्दर्यासाठीसुद्धा फायदेशीर आहे. म्हणजेच कांद्यामुळे आपल्या
त्वचेच्या अनेक समस्या सोडवल्या जाऊ शकतात. कांद्यामध्ये
अँटीबॅक्टरील, अँटिमायक्रोबल, अँटीइंफ्लेमेट्री गुणधर्म असतात.
त्यामुळे कांदा आपल्या त्वचेसाठी एखाद्या अँटीसेफ्टीक प्रमाणे काम
करते. जर आपल्याला सतत ऍक्ने व पिंपल्स येत असतील तर
त्यावर आपण कांद्याचा रसात एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स
करून पिंपल्स व ऍक्नेवर कापसाच्या किंवा बोटाच्या साहाय्याने लावू
शकता व १५ ते २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्यानी धुऊन घ्या. अशा
नियमितच्या प्रयोगामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स ऍक्ने नाहिसे
होऊन चेहरा सुंदर
व तजेलदार दिसू लागतो.
१२. हृदयाचे आरोग्य सुधारते.
कांद्यामुळे आपले हार्ट चे कार्य ही सुरळीत होऊ
शकते. लाल कांद्यामध्ये फ्लेवोनॉइट चे प्रमाण असल्यामुळे ते
आपल्या हृदयाची काळजी घेते. हृदयनिरोगी ठेवते. शिवाय
कांद्यामध्ये नैसर्गिक सल्फर हि असते. त्याचा आपल्या हृदयावर
चांगला परिणाम
होतो.
कांद्याच्या संशोधनानुसार कांद्यातील सल्फर
घटकामुळे हृदयविकाराचा धोका टळतो. कांदा हा रक्त पातळ करते.
व हार्ट अटक व स्ट्रोक चा धोका कमी करतो. कांद्यामध्ये
अँटीइंफ्लेमेट्री व अँटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्यामुळे हृदयाच्या
आरोग्यासाठी लाभदायक ठरतात व कांद्यामुळे आपल्या शरीरातील
कोलेस्ट्रॉल हि
नियंत्रित राहण्यास मदत होते.
१३. केसांमधील कोंडा नाहीसा होतो.
केसांसाठी देखील डॉक्टर च्या सल्यानुसार कांदा हा
उपायकारक ठरला आहे. कांद्यामध्ये असणारे अँटीबॅक्टरील गुण हे
केसांमधील जीवजंतूंचा नाश करतात. व इतर इन्फेक्शनपासून दूर
ठेवतात. कांद्याचा रस केसांवर लावल्यामुळे केसांतील कोंडा तर
जातोच तसेच केसही शायनर होतात व वाढ ही चांगली होते.
१४. कांदा खाण्याच्या उपायांबाबत प्रश्न.
१. कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते ?
कांद्यामध्ये प्रोपेथीझल एस ऑकसाईड नावाचे केमिकल
निर्माण होत असते व जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा आपल्या
डोळ्यातील लेक्राइमल ग्रंथीला उत्तेजित करते त्यामुळे आपल्या
डोळ्यातून पाणी येऊ लागते.
२. कांद्याच्या अतिसेवनामुळे तोंडाला वास येतो का ?
कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण असते त्यामुळे कांदा
खाल्यावर काही वेळ तोंडाचा उग्र वास येत असतो. मात्र कांदा हा
आरोग्यासाठी हितकारक असल्यामुळे कांदा खाल्यानंतर आपण तोंड
स्वच्छ ठेवू शकतो त्यावर बडीशेप
खाऊन वास कमी करू शकतो.
३. कांद्याचे दुष्परिणाम कोणते आहेत का ?
कांदा हा आपल्या आरोग्यासाठी हितकारकच आहे मात्र
काही जणांना कांद्याची अलर्जीही असू शकते त्यामुळे त्यांना
अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात. असे झाल्यास त्यांनी कांद्याचे
सेवन टाळावे व डॉक्टरांच्या सल्यानुसार उपचार घ्यावे.
If you have any doubts, please let me know.