वेलची (वेलदोडे) खाण्याचे फायदे

           भारतीय जेवणाला  स्वाद आणणारी गोष्ट  म्हणजेच वेलची. वेलचीमुळे प्रत्येक पदार्थाला स्वाद आणि सुगंध येते. पण वेलचीचे फक्त स्वाद आणि सुगंधासाठी न होता आपल्या शरीराचे स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी ही उपयोग होतो. वेलचीमध्ये विशेष तेल आणि व्हिटॅमिन सामील असतात जे अँटिऑक्सिडेंटचे काम करतात. या छोट्या वेलचीबद्दल बरेच काही जाणून घेण्यासारखे आहे आणि ते सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. काही लोक वेलची खाणे टाळतात तर तसे न करता वेलची सर्वांनी खावी. ते आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे.


            वेलची म्हणजेच वेलदोडे  खाण्याचे फायदे व ते कसे किती

 प्रमाणात खावे त्याचे आपल्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होतात का ते

 आपण पाहुयात. आपण  हा लेख वाचल्यानंतर आपल्या आहारात वेलचीचा

 समावेश नक्कीच कराल. 

          वेलचीमध्ये आढळणारे मॅग्नेशियम,आयर्न,व्हिटॅमिन

 सीनियासिनपोटॅशियमकॅल्शियम इत्यादी पोषक तत्वामुळे आपल्या

 शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी लाभदायी ठरते.

वेलची  खाण्याचे फायदे
वेलची  खाण्याचे फायदे

तूप आणि गूळ खाण्याचे फायदे | Benefits of eating ghee and jaggery read more

 

   Table of contents

     

  १. अन्नपचनासाठी लाभकारी ~

 २. घसादुखीवर रामबाण ~

 ३. उचक्या येण्याची समस्या दूर ~

 ४. वजन सुद्धा कमी करण्यास मदत होते ~

 ५. माऊथ फ्रेशनर ~

 ६. ऍसिडिटीपासून सुटका ~

 ७. तणावमुक्त राहण्यासाठी ~

 ८. केसांसाठी फायदेशीर ~

 ९. कॅन्सरवर लाभकारी ~

 १०. ब्लडप्रेशर नियंत्रित करते ~

 ११. विषारी रसायने शरीराच्या बाहेर ~

 १२. सेक्स लाईफमध्ये फायदेशीर ~

         वेलदोडे जास्त खाण्यामुळे होणारे दुष्परिणाम



  १. अन्नपचनासाठी लाभकारी ~

          आजच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये लोकांचं जेवण

 घाईघाईचे झाले आहे. भरभर जेवल्याने अन्नपचनाला त्रास होतों. मग नंतर

 ऍसिडिटीपोटदुखी,  गॅसकॉन्स्टिपेशन इत्यादींचि समस्या चालू होते. असे

 होऊ नये म्हणून आपले जेवण हे घाईघाईचे टाळणे आवश्यक तर आहेच,

त्यासोबतच अन्नपचनासाठी जेवणानंतर वेलची खाणे हेही तितकेच म्हणत्वाचे

 आहे. जेवणानंतर वेलची चगळल्याने आपले पचनक्रिया व्यवस्थित होते व

 गॅस असिडीटीचा त्रास कमी होतो. त्यामुळे रोज १, वेलची चगळणे आवश्यक

 आहे.

    

     २. घसादुखीवर रामबाण ~

           जर आपल्याला घशाचा त्रास होत असेल किंवा घसा दुखत असेल

 तर आपण सकाळी उठल्यावर एक वेलची चगळने आणि रात्री झोपतेवेळी

 एक वेलची चगळणे आवश्यक आहे. त्यावर आपण कोमट पाणी पिणे

 आवश्यक आहे. असे केल्याने घश्याच्या समस्यांवर आराम मिळेल.

       

      ३. उचक्या येण्याची समस्या दूर ~

            जर तुम्हाला उचक्या कधीपण आणि केव्हापण सुरु होत

 असतील आणि ते कधीकधी खूप वेळेपर्यंत येत असेल तर अशा वेळी

 वेलचीचे सेवन करावे आणि वरून कोमट पाणी प्यावे उचक्या येण्यापासून

 राहत मिळेल.

 

 

       ४. वजन सुद्धा कमी करण्यास मदत होते ~

               वेलचीच्या सेवनाने आपले वजन सुद्धा आटोक्यात आणता

 येते. वेलचीच्या सेवनाने आपले रक्ताशय नेहमी नियंत्रित राहते. जेवणानंतर

 वेलची  चगळल्याने आपली पचनक्रिया सुधारते. आणि अनावश्यक फॅट जमा

 होऊ देत नाही.

 

        ५. माऊथ फ्रेशनर ~

              वेलचीचा आपण माऊथ फ्रेशनर म्हणून सुद्धा वापर करू

 शकतो. काही लोकांचं २४ तास तोंडाचा दुर्गंध येत असतो. तोंडाच्या दुर्गंधीमुळे

 त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो,  लोकांमध्ये ते जास्त सहभाग घ्यायला

 टाळतात. अशा लोकांसाठी वेलची हे उत्तम पर्याय आहे. त्या लोकांनी

 सकाळपासून ते रात्री झोपण्यापर्यंत वेलची चा समावेश करावा. असे सतत

 केल्याने हळूहळू त्यांचा तोंडाचा दुर्गंध कमी होत जातो. ज्या लोकांना वेलची

 खायला आवडत नाही अशा लोकांनी वेलचीची पावडर करून जेवणात भाजीवर

 वापर करू शकता अशामुळे भाजीला टेस्टही येईल आणि आपले आरोग्यही

 चांगले राहील.

 

उन्हाळ्यात ताक पिण्याचे १९ फायदे आणि योग्य वेळ जाणून घ्या

 

          ६. ऍसिडिटीपासून सुटका ~

                वेळचींमध्ये आवश्यक गुणधर्म आढळतात. त्यामध्ये

 तेलाचे प्रमाण असते त्या इसेन्शियल ऑइलमुळे पोटाच्या आतील लेयर्स

  मजबूत होतात आणि जमा झालेली ऍसिडिटी ही हळूहळू कमी व्हायला

 मदत होते. त्यामुळे वेलचीचे सेवन करणे आवश्यक आहे.

                

           ७. तणावमुक्त राहण्यासाठी ~

                तणावमुक्तीसाठी वेलची खाणे फायदेशीर ठरते. तणावात

 असताना वेलची तोंडात घालून चावा. वेलची चगळल्यामुळे  हार्मोन्समध्ये

 पटकन बदल होऊन तणावमुक्त होण्यास मदत होते.

 

         

            ८. केसांसाठी फायदेशीर ~

                   वेलचीचा केसावर खूप चांगला उपयोग होतो.

 नियमितपणे वेलचीचा वापर केल्याने आपल्या केसातील कोंडा नाहीसा होतो.

 वेलचीच्या तेलाचा वापर आपण आपल्या कोंडा झालेल्या केसांवर केला तर

 नियमित वापरामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो. वेलचीच्या तेलामध्ये असे

 अँटीबॅक्टरील आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे आपल्या केसांना निरोगी

 ठेवण्यास मदत करते.


आले खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि नुकसान (Benefits of jinjer and disadvantages)

              

             ९. कॅन्सरवर लाभकारी ~

                   वेलची हे कर्करोगासारख्या गंभीर आजाराला नियंत्रित

 करण्यासाठी मदत करू शकते. वेलचीमध्ये असे गुणधर्म असतात जे

 कर्करोगाला विरोध करू शकतात. ज्यामुळे आपल्या शरीरात कर्करोग पेशींची

 वाढ रोखण्यास मदत करते. त्यामुळे वेलचीचे सेवन कॅन्सर आजाराशी

 संबंधित व्यक्ती करू शकते.

               

             १०. ब्लडप्रेशर नियंत्रित करते ~

                     हाय बी पी साठी दूध आणि वेलची पिणे

 फायदेशीर ठरते.दूध आणि वेलचीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण मुबलक असते व

 ते  रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.  


      ११. विषारी रसायने शरीराच्या बाहेर ~

                   वेलचीच्या रासायनिक गुणधर्मामुळे शरीरात

 अस्तित्वात असलेली फ्री-रॅडिकल आणि इतर विषारी तत्वे दूर करून शरीर

 निरोगी ठेवण्यास मदत करते.


       १२. सेक्स लाईफमध्ये फायदेशीर ~

                   वेलचीच्या वापरामुळे सेक्स लाईफ अतिशय चांगल्या

 प्रकारे  होते. वेलचीमुळे शरीराला आतून एनर्जी मिळते. यासोबतच

 इन्फर्टिलिटी ची समस्या सोबत असणाऱ्या लोकांनी ही वेलचीचे सेवन करणे

 फायदेशीर आहे. 


     सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे

 

              वेलदोडे जास्त खाण्यामुळे होणारे दुष्परिणाम


    १. वेलचीच्या अतिसेवनाने छातीत जळजळणे किंवा उलटी होण्याची शक्यता

 असते .

    २. शरीरात प्रतिक्रिया सुरु होऊन ऍलर्जी होऊ शकते.

    ३. आपली दुसरी कोणती औषधे चालू असल्यास वेलचीचे सेवन टाळावे.

 औषधांसोबत वेलचीचे सेवन केल्यास  त्यातील एंझाइम हे औषधासोबत

 रिऍक्शण होऊ शकते.

    ४.वेलचीचे मोट्या प्रमाणावर सेवन केल्यास आपली प्चनसंसंस्था  पचन

 करण्यास अक्षम होते.  अशा परिस्थितीत मूत्राशयात किडनीस्टोन ची

 समस्या देखील उद्भवू शकते.

          या सर्व गोष्टीमुळे वेलची खाण्यासोबत चे त्याचे फायदे व नुकसान सांगितले आहे. आपण त्याचा वापर योग्य रित्या योग्य प्रमाणात केला पाहिजे.

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.