तूप आणि गूळ खाण्याचे फायदे | Benefits of eating ghee and jaggery

 

        शरीरातील स्नायू बळकट होण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता

 असते. त्यामुळे कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे असते. शरीरातील निम्मे

 आजार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात. सगळ्याच पदार्थातून कॅल्शियम

 मिळत असते असे नाही. त्यासाठी आपल्याला योग्य तो आहार घेणे गरजेचे

 असते. सगळेजण सारखे आहार घेतात असं नाही. त्यांच्या आवडीनुसार

 आहार निवडतात त्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू लागते. तर

 आपण आपल्या शरीराला योग्य तो आहार दिला पाहिजे. तूपामुळे जेवणाला

 टेस्ट येते म्हणून बरीच लोक तूपाचा वापर करतात. ते योग्यच आहे.

 तूपासोबत गुळाचे सुद्धा सेवन केले पाहिजे. गुळामध्ये जास्त प्रमाणात लोह

 असते ते आपले हाडांसाठी व एनर्जीसाठी उत्तम असते. तूप आणि गूळ हे

 दोन्ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी असतात. तुपामध्ये

 जीवनसत्व , जीवनसत्व इ, जीवनसत्व डी, फॅटी ऍसिड यासारखे पोषक तत्वे

 तर गुळामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम, झिंक यासारखे

 पोषकतत्व आढळतात.


तूप आणि गूळ खाण्याचे फायदे | Benefits of eating ghee and jaggery
तूप आणि गूळ खाण्याचे फायदे

गुलाबी  सुंदर ओठ सर्वांनाच हवं असतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये क्रॅक झालेले

 कोरडे झालेले ओठ ही गोष्ट सामान्य आहे.ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी

 घ्यावयाची काळजी read more


            गूळ आणि तूप या दोन्हींचे एकत्रपणे सेवन केल्यास त्यातून

 मिळणारे पोषण दुप्पट होतात व ते आपल्या आरोग्यासाठी  खूप लाभदायी

 ठरतात. या दोन्हींचे मिश्रण तर चांगले असतेच याशिवाय आपल्या शरीरात

 तंदुरुस्ती ही येते. तर जाणून घेऊया तूप आणि गूळ खाल्ल्याने आपल्या 

आरोग्याला काय काय फायदे होतात.


Table of contents


  १. रक्ताची कमतरता दूर करते ~

 २. पोटाच्या समस्या होतील दूर`~ 

 ३. हाडे मजबूत होतात ~

 ४. वजन  आटोक्यात ठेवते ~

 ५. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते ~


१.रक्ताची कमतरता दूर करते ~

            शरीरात लोहाची कमतरता झाली की  अशक्तपणा येऊ

 शकते. तसेच शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाली की व्यक्तीला 

अनेमिया सारख्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी तूप आणि

 गुळाचा एकत्र सेवन केल्यास शरीरात रक्ताची कमतरता दूर होऊ शकते.

 गुळामध्ये लोहाचे प्रमाण  अधिक प्रमाणात असते त्यामुळे शरीरात

 रक्तपुरवठा वाढतो. यामुळे अनेमिया  या समस्येपासून सुटका होऊ शकते.

 

   २.पोटाच्या समस्या होतील दूर ~                           

                    गूळ तूपामुळे आपल्या पोटाच्या तक्रारीसुद्धा दूर

 होण्यास  मदत होते. यासाठी गूळ आणि तूप यांचं एकत्र सेवन करावं.

 यामुळे आपल्या शरीरातील आतड्यांची हालचाल सुलभरीत्या होण्यास मदत

 होते. तसेच ऍसिडीटी, पोटदुखीपासून खूपच आराम मिळतो.

  

    ३. हाडे मजबूत होतात ~

                        नियमितपणे तूप आणि गूळाचे सेवन केल्याने

 आपल्या शरीरातील हाडे बळकट होतात. गुळात कॅल्शियम असते तर तुपात

 विटामिन के -२ आढळते.


 ४. वजन  आटोक्यात ठेवते ~

              तुपाने वजन अजिबातच वाढत नाही. मात्र  तूप खाताना

 आपण योग्य प्रमाणात खायला हवे. वाढलेले वजन कमी करायचे असेल तर

 तूप खाऊन वजनावर नियंत्रण ठेऊ शकतो. तूप गूळ खाल्ल्याने आपल्या

 शरीरात एनर्जी जास्त वेळ राहते व एक्सट्रा खाण्यापासून  बचावतो म्हणजेच

 फुल्ल डाएट होते वजन कमी होऊ शकते. एका रिसर्च नुसार ऑक्सिडाइज

 तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅटी असिड आणि ऑलिक असिड चे प्रमाण असते हे

 दोन्ही घटक वजन वाढण्यापासून रोखतात. यातील सॅच्युरेटेड असिड हे

 एक्सट्रा फॅट बर्न व्हायला मदत करते. याशिवाय तूप आणि गूळ हे

 पचनक्रियेस उत्तम आहेत. यामुळे आपले मेटॉबॉलिसम चांगले राहते व वजन

 कमी करण्यास मदत करते.


५. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते

              रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल  वाढल्याने हृदयाच्या समस्या, रक्तदाब

 आणि इतर आजारांना निमंत्रण  मिळते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित  करण्यासाठी

 योग्य प्रमाणात नियमित तुपाचे सेवन करावे ते आपल्याला फायदेशीर

 फायदेशीर ठरते. तुपामध्ये असणारे पोषक तत्व हे कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे

 काम करते. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.