गरोदरपणात महिलेने घ्यावयाची काळजी| Care to be taken by a woman during pregnancy

 गरोदरपणात महिलेने घ्यावयाची काळजी


गरोदरपणात महिलेने घ्यावयाची काळजी| Care to be taken by a woman during pregnancy
गरोदरपणात महिलेने घ्यावयाची काळजी| Care to be taken by a woman during pregnancy

        प्रत्येक स्त्रीची एक सुंदर कल्पना म्हणजे ''गर्भधारणा''.  गर्भधारणा ही एक सुंदर आणि जबाबदारीचा काळ असतो. अशा वेळी महिलेने स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. 


          विशेषतः जेव्हा गरोदरपणाची लक्षणे दिसू लागतात तेव्हा त्या पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या माहीच्या काळात होणाऱ्या हार्मोनल बदलामध्ये. आपल्या हार्मोन्स मधील बदलांचा असा अर्थ होतो की आपले शरीर थकल्यासारखे होऊ लागते. हे ही शक्य आहे की आपण विनाकारण रडणे पण सुरु कराल. 


         अशा परिस्थितीत स्वतःला व आपल्या सभोवतालच्या लोकांना हार्मोन्स बदलांमुळे हे आपल्या बाबतीत घडत आहे हे माहित असणे गरजेचे आहे. यासाठी गरोदर स्त्रियांनी स्वतःच्या खाणपानाकडे आरोग्याकडे लक्ष देणे फारच गरजेचं आहे. खानपानामध्ये चिरलेल्या भाज्या,  दही, फळे,  चीज, कॉटेज, मसूर,  स्प्राऊट्स, सोया मिल्क,  अंडी इत्यादी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. कारण ते गर्भवती महिलेसाठी उत्तम आहार आहे.


        अशा प्रकारच्या आहारामध्ये प्रोटीन फायबर भरपूर प्रमाणात असतात.  ते आपल्याला  व गर्भातील शिशुच्या वाढीसाठी उत्तम आहार असतो. दिवसातून कमीतकमी ३, ४ वेळा गर्भवतीने पौष्टिक कॅल्शियमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. 


            गर्भवती महिलेने नियमितपणे पाणी पिणे गरजेचे आहे.त्यासोबतच

 लिंबू सरबत,इलेक्ट्रोड पिऊन स्वतःला हायड्रेट करावे. विविध फळांचा रस

 पूरक पौष्टिक आहारातुन व्हिटॅमिन सी पुरेश्या प्रमाणात आपल्या शरीराला

 मिळत आहे याची खात्री करून घ्यावी. 


          यासोबतच गर्भवती महिलेने स्वतःचे वेळापत्रक केले पाहिजे जेणेकरून सगळी कामे,  जेवण,  औषधे,  विश्रांती वेळेतच होईल आणि जास्त दगदग होणार नाही याची काळजी ही घेतली पाहिजे.


           गर्भधारणेनंतर काहींना मळमळणे,  उलटी होणे काही पदार्थांचा विचित्र वास येणे अशा सहन न होणाऱ्या गोष्टी जाणवतात. त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरोदर महिला औषधे घेऊ शकतात. 


         विशेष डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोळ्या औषधे घेऊ नयेत. जर तसे केलात तर आपल्या बाळासाठी ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे याबाबतीतही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भवती महिलेने तिच्या दिवसाच्या निश्चित वेळापत्रकेनुसार चालले पाहिजे जेणेकरून तिला विश्रांतीसाठी थोडा वेळ मिळेल. यामुळे ती अधिक थकणार नाही. 


          गरोदरपणात रक्तदाब कमी जास्त होऊ शकते त्यामुळे वेळेत आहार व सतत पाणी पिणे दर १ तासातुन किमान १० मिनिटे चालने योग्य ठरेल.   

              बारीक सारीक गोष्टींकडेही लक्ष देणे गरोदर महिलेसाठी फार गरजेचे

 आहे. जसजसे गर्भधारणेचा काळ वाढत जाईल तसतसे आपल्या वाढत्या

 वजनानुसार शरीराचे गुरुत्वाकर्षण देखील बदलू शकते यामुळे पाठदुखीचा

 त्रास,  पायात सूज येणे, व शरीरातील स्नायू कडक होणे असे होऊ शकते.


             गर्भावस्थेत जर आपण दिवसभर बसून राहात असाल तर दर २ तासांनी सुमारे ५ मिनिटे चाला. थोड्या थोड्या वेळानी आपल्या शरीरातील स्नायूंची हालचाल होणे गरजेचे आहे. 

               ह्या सर्व गोष्टी गरोदर महिलेसाठी व बाळासाठी खूप आवश्यक आहेत.

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.