महाराष्ट्रभर
पाऊसाने जोर धरला असताना Eye Flu आजार हि पूर्ण
देशभर धुमाकूळ घालत आहे. प्रत्येक राज्यातून Eye Flu चे पेशंट आढळून
येत आहेत. पावसाळ्यात वाढणारा संसर्गजन्य आजार Eye Flu प्रत्येकाची चिंता वाढवणारा ठरला आहे. व्हायरल इन्फेकशनमुळे
प्रत्येकाला त्याचा सामना करावा लागत आहे.
![]() |
Eye Flu |
आय फ्लू चे symptoms आणि न होण्यासाठी
काय काळजी आणि झाला तर काय काळजी घेता येईल ते आपण बघूया.
आय फ्लू काय आहे ?
आय फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. त्याला कंजंक्टिवायटिस (Conjunctivitis) आणि पिंक आय (pink eye) असेही म्हणतात. यामध्ये डोळे लाल होतात. मराठी भाषेत डोळे येणे असेही म्हणतात.
डोळ्यांचा संसर्ग(Eye Flu) दूर करण्यासाठी
सोपे उपाय
मधामुळे मिळेल आराम
![]() |
Eye Flu |
मधामध्ये
अँटीबॅक्टरील गुण असतात. त्यामुळे आय फ्लूची लागण झाली असताना मधाचा उपयोग अवश्य
करावा. तो असा एक ग्लास पाणी घ्यावे त्यामध्ये दोन चमचे मध घालावा. आणि व्यवस्थित
मिक्स करून त्याने दिवसातून चार ते पाच वेळा डोळे धुवावेत. त्याने डोळ्यांना
चांगला आराम मिळेल. आणि डोळ्याचा लालसरपणा कमी होईल.
गुलाबपाणी
![]() |
Eye Flu |
गुलाब पाण्यामुळे
डोळ्यांना थंडावा मिळून डोळ्यांना आराम मिळतो. गुलाबजल मध्ये अँटीबॅक्टरीया आणि
अँटिसेप्टिक असे गुणधर्म असतात. आणि त्यामुळेच डोळ्यांचा आजार लवकर कमी होतो.
गुलाबजल प्रत्येक डोळ्यात दोन दोन थेंब सोडावा. त्यामुळे डोळ्यातील चिकटपणा कमी
होऊन चिपडे येणेही कमी होईल.
बटाटे चा डोळ्यांना फायदा
![]() |
Eye Flu |
डोळ्यामध्ये जळजळ
आणि खाज होत असेल तर बटाटे चे गोल काप
करून ते डोळ्यावर आर्धा तास ठेवून द्यावे आराम मिळेल. कारण बटाटा थंड आहे.
Eye Flu मध्ये तुळशीचा
उपयोग
तुळशीचे चार पाच
पाने रात्रभर पाण्यात टाकावे ते पाणी सकाळी डोळे धुण्यासाठी वापरावे. कारण
तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट असल्यामुळे
ते संसर्गजन्य आजार रोखण्यास मदत करतात.
वजन कमी करण्यासाठी काय खावे | vajan kami karnyache upay.
थंड पाण्याचा
वापर
डोळ्यामध्ये खुप
जळजळ होत असेल तर थंड पाण्याची कापडाची पट्टी डोळ्यावर ठेवावी त्यामुळे आराम
मिळेल. डोळ्यातील लालसरपणा आणि सूज हि कमी होईल.
काय आहेत आय फ्लूची(Eye Flu) लक्षणे ?
डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज
येणे, डोळ्यामध्ये जळजळ
होणे आणि अंधुक दिसणे. त्याचबरोबर जास्त प्रमाणात चिपडे येणे.
गरोदरपणात महिलेने घ्यावयाची काळजी| Care to be taken by a woman during pregnancy
आय फ्लू(Eye Flu) कसा पसरतो ?
जर तुम्ही आय
फ्लू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास या व्हायरस ची लागण होऊ शकते.
सांसर्गिक व्यक्ती खोकल्याने, शिकल्याने त्याच्या अगदी जवळ असल्यामुळे सुद्धा आय फ्लू चा
संसर्ग होऊ शकतो.
आय फ्लूपासून कसा बचाव करायचा.
*
दिवसातून ४ ते ५
वेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत.
*
दुसऱ्या
व्यक्तीचे कपडे टॉवेल वापरू नयेत.
*
संक्रमित
व्यक्तीपासून लांब राहायला हवे.
*
सतत डोळ्यांना
स्पर्श करू नये.
*
बाहेर जाताना सतत
चष्मा घालून जावे. अन्यथा बाहेर जाणे टाळावे.
*
हात डोळे स्वच्छ
ठेवावेत.
*
डोळ्यांना दाबून
चोळू नये.
If you have any doubts, please let me know.