केळी खाण्याचे फायदे; पचनापासून ते त्वचेपर्यंत सर्व समस्यांवर गुणकारी

 

                  रोज  केळी  खाणे याला आपल्या जीवनात अनन्य साधारण

 महत्व आहे. फळामध्ये केळी ही उत्तम आणि सहज कोठेही उपलब्ध होणारे

 फळ आहे. आणि केळी हे सर्वांनाच खाणे शक्य असून ते अगदी सहजरित्या

 उपलब्ध होते. केळीमधून आपल्याला भरपूर प्रमाणात आवश्यक ते

 जीवनसत्व आणि खनिजे मिळतात.


    

        केळीमधील पोषक घटक पुढीलप्रमाणे-

           केळीमध्ये व्हिटॅमिन ए,  व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन

 डी,  प्रथिने,  कॅल्शिअम,  फायबर,  फॉस्परस,  पोटॅशिअम आणि लोह अशा

 प्रकारचे पोषक तत्व मिळतात.

केळी खाण्याचे फायदे; पचनापासून ते त्वचेपर्यंत सर्व समस्यांवर गुणकारी
केळी खाण्याचे फायदे; पचनापासून ते त्वचेपर्यंत सर्व समस्यांवर गुणकारी


 केळी खाण्यापासून आपल्या आरोग्यावर होणारे फायदे पुढीलप्रमाणे-


  Table of contents


१.      ऊर्जेचा स्तोत्र –

२.      हाडांसाठी उत्तम –

३.      त्वचेसाठी उपयुक्त –

४.      डोळ्यांसाठी केळी फायदेशीर 

५.      पचनक्रिया सुधारते 

६.      हृदयाचे स्वास्थ्य उत्तम 

७.      दातांसाठी उत्तम 

८.      पोट साफ होते –

९.      वजन कमी करण्यासाठी उपयुक्त 


१.      ऊर्जेचा स्तोत्र –

         केळी हे ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. केळी खाल्ल्याने आपल्याला आलेला

 थकवा नाहीसा होऊन खूपच फ्रेश वाटते. आपली रोजची कामे सुरळीत

 होतात. आळस येत नाही. म्हणजेच केळीला एनर्जीबार म्हणणे चुकीचे

 नाही. केळीमुळे शारीरिक ऊर्जा मिळून मानसिक आरोग्य ही चांगले

 राहते.

 

२.      हाडांसाठी उत्तम –

          केळीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असल्यामुळे ते आपल्या

 शरीरातील हाडाच्या वाढीसाठी आणि बळकटीसाठी चांगली भूमिका पार

 पाडतात. केळीमुळे आपल्या शरीरातील हाडांना योग्य प्रमाणात कॅल्शिअम

 मिळून हाडांची मजबुती टिकून राहते.

 

३.      त्वचेसाठी उपयुक्त –

                  केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ऍसिड असून ते स्लिप

 हार्मोन्सचे काम करते. म्हणजे रात्रीची चांगली झोप होते. केळीने त्वचा

 तजेल आणि चमकदार  बनते. चांगली झोप तर चांगला परफॉर्मन्स

 म्हणतात. व्यवस्थित झोप होणे महत्वाचे त्यासाठी दररोज केळी खाणे

 महत्वाचे.

 

४.      डोळ्यांसाठी केळी फायदेशीर

            केळीमध्ये कॅरोटिनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. कॅरोटिनॉइड्स

 हा अ जीवनसत्वाचा प्रकार आहे. अ जीवनसत्व हे डोळ्यांच्या रेटिनामध्ये

 रंगद्रव्य वाढवते. म्हणून रातांधळेपणा सारख्या आजारापासून बचाव होतो.

 

५.      पचनक्रिया सुधारते

            केळीमध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रियेचे कार्य सुरळीत चालते.

 फायबरमुळे अन्नाचे योग्य पचन होऊन आंत्रचळवळीची प्रक्रिया सुलभ

 होते. त्यामुळे पोटाशी संबधित समस्या दूर होतात. एवढेच नाही तर

 केळीमधील स्टार्च पोटासाठी आणि शरीरासाठी चांगला असतो.


६.      हृदयाचे स्वास्थ्य उत्तम

              केळीमध्ये व्हिटॅमिन बी ६ असून ते हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

 मानले जाते. केळीच्या सेवनाने रक्तदाब सामान्य राहून हृदयाची कार्ये

 योग्यरित्या पार पाडतात.

 

७.      दातांसाठी उत्तम

              केळीचे साल दातांवर घासल्याने दात स्वच्छ होण्यास मदत होते.

 हिरड्यांचे पोषणही चांगले होते. दात मजबूत देखील होतात दातांना योग्य

 प्रमाणात कॅल्शिअम मिळते.

 

८.      पोट साफ होते –

              बॉडी डिटॉक्स च काम केळीमुळे नक्कीच होते. व्यवस्थित

 अन्नपचन होऊन न पचलेले भाग शरीराबाहेर अगदी सुलभरित्या टाकते.

 जेवणानंतर केळी खावी. पचनाला उत्तम असते.


    Read more डाळिंब खाण्याचे फायदे जाणून घ्या मराठीमध्ये


९.      वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

             केळीचा उपयोग आपण वजन कमी करण्यासाठी करू शकतो. रोज

 सकाळी आपण २ केळी खाऊन वजन कमी करू शकतो. केळीमध्ये

 आवश्यक असणाऱ्या जीवनसत्वामुळे दिवसभराची एनर्जी टिकून

 ठेवण्याची क्षमता असते. केळी तुम्ही कमी फॅट असलेल्या दुधासोबत घेऊ

 शकता. यामुळे नक्कीच वजन कमी होण्यास मदत होईल.


         केळी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. शरीरयष्टी

 आणि डाएट करण्यासाठी अगदी लहानापासून ते मोठयांपर्यंत केळीचे सेवन

 करणे आरोग्यासाठी चांगले आहे. म्हणून आपण आपल्या रोजच्या

 जीवनामध्ये केळीचा समावेश करणे महत्वाचे आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.