डाळिंब खाण्याचे फायदे जाणून घ्या मराठीमध्ये | Benefits of Pomegranate |

              डाळिंब खाण्याचे फायदे जाणून घ्या मराठीमध्ये | Benefits of Pomegranate |

           

डाळिंब खाण्याचे फायदे जाणून घ्या मराठीमध्ये | Pomegranate Benefits
 डाळिंब खाण्याचे फायदे जाणून घ्या मराठीमध्ये | Pomegranate Benefits

      

    टुचकणं तोंडाला पाणी आणणार फळ म्हणजे डाळिंब. थंडीचा सिझन म्हणजे वर्षभर

भरपूर फळे आणि पालेभाज्या उपलब्ध होण्याचा कालावधी असतो. या दिवसात अशा

ताज्या आणि पौष्टिक भाज्या खाल्ल्या तर आपले आरोग्य वर्षभरासाठी अगदीच उत्तम

राहण्यासाठी मदत होते. या फळभाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर पोषक घटक

मिळते, त्यामुळे त्याचा आपल्या आहारात जास्तीत जास्त समावेश करावा असे तज्ञ

वारंवार सांगत असतात. सध्या मार्केट मध्ये येणार एक महत्वाचे फळ म्हणजे डाळिंब.

डाळिंब या फळाचे आपल्या आरोग्यासाठी विविध फायदे होतात, आणि ते आपल्याला

माहित असताना आपण ते फळ खायचा कंटाळा करतो. परंतु डाळिंबाच्या दाण्यामध्ये

सर्वाधिक अँटी व्हायरल आणि अँटीबॅक्टरील गुणधर्म असते आणि हे सिद्ध ही झालेलं

आहे. त्यामुळे थंडीच्या काळात मार्केट मध्ये सहज मिळणारी डाळिंब आपण आवर्जून

खायला हवीत.

         आत्ताच्या जमान्यात बॉडी डिटॉक्स करण्याचे बरेच पद्धती आले आहेत. मग

त्यामुळे लोक बॉडी डिटॉक्स करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात. त्यावर

त्यांच्यासाठी एकाहून अनेक डाएट्स दिली जातात. त्यासाठी ग्रीन टी चा देखील वापर

करतात ते हि योग्यच आहे. पण तुम्हाला सरप्राईज वाटेल कि डाळिंब हे फळ बॉडी

डिटॉक्स करण्यासाठी ग्रीन टी पेक्षा ही उत्तम पर्याय ठरू शकते. प्रसिद्ध सेलिब्रेटी

आहारतज्ञ् ल्युक कोटिन्हो यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे की यामध्ये त्यांनी डाळिंब

खाणे का फायदेशीर आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे  मांडले आहेडाळिंब हे वेटलॉस

साठी आणि स्किन व्ग्लोइंग साठी उत्तम प्रकारे काम करते


 ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी Read More


                              ते आपण पाहुयात.

      Table of contents

     वेटलॉससाठी फायदेशीर 

        शरीरावर सूज आलेली कमी होते

    ३शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते

        ४.  आपल्या दातांचे आरोग्य उत्तम ठेवते 

    ५ब्लडप्रेशच्या  समस्येवर उपयुक्त

   6. गरोदरपणात डाळिंब खाणे हा ही एक उत्तम पर्याय आहे.


    १वेटलॉससाठी फायदेशीर 

डाळिंब खाण्याचे फायदे जाणून घ्या मराठीमध्ये | Pomegranate Benefits
 डाळिंब खाण्याचे फायदे जाणून घ्या मराठीमध्ये | Pomegranate Benefits



वजन कमी करण्यासाठी काय खावे | vajan kami karnyache upay.

 डाळिंब या फळामध्ये खूप मोट्या प्रमाणात अँटिव्हायरल आणि अँटीऑक्सीडंनट्स

  असतात. त्यामुळे आपल्या आतड्याचे आरोग्य अतिशय उत्तम प्रकारे ठेवण्यास

मदत करते. आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आपले वजन ही आटोक्यात

ठेवता येते आणि आपली त्वचा पण इतकी ग्लोइंग होते कि काही दिवसात आपण

स्वतःला ओळखूही शकणार नाही. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात

हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्य चांगली राहण्यास मदत

होते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि वजन आटोक्यात राहते. त्यामुळे

वजन कमी करायचे असल्यास नियमित डाळिंब खायला हवे. डाळिंबाचे अजून फायदे

म्हणजे शरीरातील रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवते. शरीराला  आतून आपण व्यवस्थित

ठेवलं तर शरीराच्या वरती लगेच फरक दिसू लागतो. त्यामुळे लोकांनी फळे पालेभाज्या

भरपूर प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत .

 

 . शरीरावर सूज आलेली कमी होते

                 डाळिंबातील अँटीऑक्सीडंटमुळे शरीराचा दाह आलेला सूज कमी

होण्यास मदत होते. यामुळे आर्थ्रोयटीसारखे आजार होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो .

 

 ३. शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

             या फळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते . आपले आरोग्य उत्तम

प्रकारे राहण्यासाठी शरीरात लोह आणि हिमोग्लोबिन पुरेश्या प्रमाणात असणं खूप

आवश्यक असते. डाळिंबामुळे आपल्या शरीरात लाल रक्तपेशी वाढतात आणि आपल्या

शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत होते.

 

 ४. आपल्या दातांचे आरोग्य उत्तम ठेवते

          डाळिंबामध्ये असणारे अँटी व्हायरल घटक आपल्या दातांच्या आरोग्यासाठी

फायदेशीर ठरतात. त्यामुळे डाळिंबाचे दाणे खाणे हे आपल्या दातांचे हिरड्यांचे आरोग्य

चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात .

 

 ५. ब्लडप्रेशच्या  समस्येवर उपयुक्त

          डाळिंबाचा ज्यूस नियमितपणे  पिणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते.

ब्लडप्रेशर ही सध्या अतिशय सामान्य समस्या झालेली असून हा ब्लडप्रेशर

आटोक्यात आणण्यासाठी डाळिंबाचा रस हा एक उत्तम  पर्याय आहे.

    

 ग्रीन टी कधी प्यावी.ग्रीन टी चे फायदे Read More

            

 6. गरोदरपणात डाळिंब खाणे हा ही एक उत्तम पर्याय आहे.

डाळिंब खाण्याचे फायदे जाणून घ्या मराठीमध्ये | Pomegranate Benefits
 डाळिंब खाण्याचे फायदे जाणून घ्या मराठीमध्ये | Pomegranate Benefits


 👉 गरोदरपणात महिलेने घ्यावयाची काळजी| Care to be taken by a woman during pregnancy


           जर गरोदर स्त्रिया प्रेगनॅन्सी  मध्ये डाळिंब खाल्ले तर  तर होणारे बाळ

हे अतिशय गोजिरवाणं आणि बाळसेदार होते. त्यामुळे त्या दिवसात ही आपण डाळिंब

खाल्ले पाहिजेत. निसर्ग आपल्याला खूप काही देत. फक्त ते आपण घ्यायला पाहिजे

खायला पाहिजे. मगच आपल्याला त्याचे योग्य परिणाम दिसतील. डाळिंबाप्रमाणे आपण

इतरही फळे आवर्जून खाल्ली पाहिजेत. प्रत्येक फळात चांगले गुणधर्म असतातच.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.