ग्रीन टी कधी प्यावी. ग्रीन टी चे फायदे
ग्रीन टी मध्ये अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो. त्याची पोषकता आपल्याला दिवसभर ताजतवाने ठेवण्यास मदत करतात. याच्या व्यतिरिक्त ग्रीन टी चे खूप फायदे आहेत. त्यामध्ये वेटलूज करण्यासोबतच हार्ट अटॅक,स्किन प्रॉब्लेम्स अशा अनेक बाबतीमध्ये ग्रीन टी फायदेशीर ठरते.
![]() |
ग्रीन टी कधी प्यावी.ग्रीन टी चे फायदे| Green tea benefits. |
ग्रीन टी चे प्रकार (Types of Green Tea)
ग्रीन टी चे अनेक प्रकार मार्केटमध्ये पाहायला मिळतात. ग्रीन टी हे कोवळ्या पानापासून देखील तयार करतात या व्यतिरिक्त टी बॅग्ज, इन्सटंन्ट पावडर, स्वीटनर किंवा नैसर्गिक साखरेसोबत सीरपच्या स्वरुपात आणि हेल्थ सप्लीमेंटमध्ये कॅप्सूलच्या स्वरुपात ग्रीन टी उपलब्ध आहे.
Table of Contents
१) कसं बनतं ग्रीन टी?
कॅमेलिया सिनेसिस (camellia sinensis plant) या वनस्पतींच्या सुकवलेल्या पानांपासून ग्रीन टी बनवला जातो. ग्रीन टी ची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि कमी कालावधीत बनणारी असते. त्यामुळे ग्रीन टी मधील पोषकतत्वे आणि फ्लेवोनॉइड्स (flaonoids)नावाच्या पोषकाचे प्रमाण सर्वाधिक असते व ती आपल्या शरीराला ताकदी साठी खूप प्रभावी असते. चीनदेशामध्ये ग्रीन टी चा वापर हा औषध म्हणून करतात. जखमा भरून काढण्यासाठी आणि अन्नपचनासाठी वजन कमी करण्यासाठी डोकेदुखी साठी ग्रीन टी चा फायदा होतो . मागील काही वर्षातच भारतात ग्रीन टी चा वापर वाढत चाललं आहे. आपल्याकडे ग्रीन टीचा वापर वेटलॉस साठी मोट्या प्रमाणावर केला जातो.
👄ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी Read More
२) वेटलॉस करण्यासाठी ग्रीन टी चा उपयोग.
![]() |
ग्रीन टी कधी प्यावी.ग्रीन टी चे फायदे| Green tea benefits. |
चहा पिल्याने काय होते | चहाचे प्रकार |
या ग्रीन टीच्या बाबतीत अनेकांचे असे म्हणणे आहार कि ग्रीन टी दररोज प्यायल्याने आपले वाढलेले पोट कमी करता येऊ शकते. अनेक आहारतज्ञ् आणि हेल्थ एक्स्पर्ट ग्रीन टी पिण्याचे फायदे सांगतात. ग्रीन टी हे एक असं हेल्थी ड्रिंक आहे कि, जे प्यायल्याने आपल्या शरीरातील मेटाबोलिजम तंदुरुस्त राहते . यामुळं आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थितरित्या होते. ग्रीन टी मध्ये कॅफेन नावाचे फ्लेवोनॉइड समाविष्ट असते. यात कॅटेचिन हे एक प्रकारचे पोषकत्व असून ते आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. रिसर्चनुसार ग्रीन टी मध्ये कॅटेचिन नावाचे फ्लेवोनॉइड आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात एनर्जी देते. ज्यामुळे आपल्या अन्नाचे नीट पचन होऊन आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास फायदेशीर होते.
३) खरचं ग्रीन टी प्रभावी आहे का?
२०१० मध्ये पब्लिश झालेल्या एका अहवालानुसार ग्रीन टीच्या नियमित वापराने आपले वाढलेले वजन कमी केले जाऊ शकते . परंतु आपल्याला ग्रीन टीचा निकाल खूप दिवसांनी पाहायला मिळतो. ग्रीन टी सोबतच आपल्याला नियमित व्यायाम केला पाहिजे व योग्य तो आहार वेळच्यावेळी घेतला पाहिजे, तरच आपले वजन लवकर कमी होऊ शकते . या प्रक्रियेमध्ये ग्रीन टी हि एक सहाय्यकाही भूमिका पार पाडते. त्यामुळे आपले वजन फक्त ग्रीन टी मुळे कमी होईल अशा भ्रमात राहू नका. दररोज ग्रीन टी सॊबत एक्सरसाईझ व पौष्टीक आहाराची पण गरज असते.
४) ग्रीन टीचे सेवन कधी आणि किती प्रमाणात करावे?
दिवसभरात तुम्ही ग्रीन टी चे २ ते ३ कप घेऊ शकता . परंतु याचे प्रमाण शारीरिक क्षमतेवर व व्यक्तीच्या मेटाबॉलिजम वर अवलंबून असते. काही लोकांना कॅफेन सूट होत नाही त्यांनी ग्रीन टी घेणे टाळावे. कारण जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने त्यांचा उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो.
ग्रीन चहा पिण्याची योग्य वेळ ही सकाळच्या वेळी ब्रेकफास्ट कार्याच्या दरम्यानची आहे. सकाळच्या ७ ते ८ च्या दरम्यान ग्रीन टी पिल्यास जास्तीत जास्त फायदा होतो व त्याचे चांगले परीणामही दिसून येतात व आपल्या शरीराची पचनक्षमता ही सर्वात जास्त सक्रिय होऊ लागते.
💖टुचकणं तोंडाला पाणी आणणार फळ म्हणजे डाळिंब. थंडीचा सिझन म्हणजे वर्षभर
भरपूर फळे आणि पालेभाज्या उपलब्ध होण्याचा कालावधी असतो. या दिवसात अशा
ताज्या आणि पौष्टिक भाज्या खाल्ल्या तर आपले आरोग्य वर्षभरासाठी अगदीच उत्तम
राहण्यासाठी मदत होते.Read More
५) यात समाविष्ट असलेले इतर घटक.
१. ‘ब’
जीवनसत्व (Vitamin B)
२. फॉलिक अॅसिड (folate)
३. मॅग्नेशिअम (magnesium)
४. फ्लेवोनॉयड्स (flavonoids)
६) ग्रीन टी चे होणारे फायदे (Benefits of Green Tea)
ही ग्रीन टी फक्त वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असून ते इतर आजार/व्याधी दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या रिसर्चमध्ये असे आढळून आले की कॅन्सर या आजारावर ग्रीन टी हा आरामदायी ठरू शकतो. कॅन्सर अशा भयंकर आजाराचे बॅक्टरीयांवर प्रतिबंध घालण्याचे काम हे ग्रीन टी करतं.
एवढाच नव्हे तर आपली स्किन प्रॉब्लेम्स दूर ठेवण्यासाठी व स्किनवर ग्लो येण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. ग्रीन टी च्या सेवनाने उन्हामधून येणाऱ्या यूव्ही म्हणजेच अल्ट्रा व्हायोलेट रेज किरणांपासून बचाव करतो. तसेच आपल्या स्किनवर सुरकुत्या किंवा त्वचा काळवंडणे अशा प्रॉब्लेम्सपासून सुटका मिळते. असच दररोज ग्रीन टी प्यायल्याने आपलय हृदयाचे काम व्यवस्थित चालू राहते.
७) हृदयासाठी फायदेशीर (green tea for heart)
हा ग्रीन चहा प्यायल्याने आपले हृदय निरोगी राहणार आहे. २००६ मध्ये पब्लिश झालेल्या द मेडिकल असोसिएशनच्या स्टडी नुसार ग्रीन टी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. जपानी नागरिकांवर शोधन करण्यात आले होते. तेथील नागरिकांमध्ये ४० वयापासून ते ७९ वयाच्या नागरिकांचा समावेश होता. या रिसर्च मध्ये असे आढळून आले की,ज्या लोकांना दररोज ५ कप ग्रीन टी प्यायला दिला जात होता त्या लोकांना हृदयाशी संबधित असणाऱ्या समस्यांवर इलाज झाला होता. नियमितपणे ब्लॅक कॉफी पिल्याने तुम्हाला होतील ‘हे’ 6 आरोग्यदायी फायदे
केळी खाण्याचे फायदे; पचनापासून ते त्वचेपर्यंत सर्व समस्यांवर गुणकारी
८) त्वचेसाठी लाभदायी ग्रीन टी (green tea for skin care)
ग्रीन टी पिल्याने तुमची त्वचा निस्तेज व कोरडी राहत नाही. त्यामुळे ओलावा कायम टिकून राहतो. अशाप्रकारे ग्रीन टी त्वचेसाठी मोइस्चरायझर म्हणून काम करतो. त्यामुळे तुमची त्वचा मुलायम राहते. वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये असणारे पोषकतत्वे उपयोगी ठरतात.
९) चरबी (कॉलेस्ट्रॉल) कमी करण्यास सहाय्यक
ग्रीन टी दररोज पिल्याने तुमच्या शरिरातील अतिप्रमाणात वाढलेली चरबी बाहेर पडते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होऊन रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजस दूर करण्यास ग्रीन टी ची चांगल्याप्रकारे मदत होते. या शिवाय आपल्या शरिरातील कॉलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात राहण्यास आणि शरिराचे कार्य उत्तमरीत्या राहण्यास ग्रीन टी लाभदायकच ठरतो.
१०) स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतो
ग्रीन टी नियमित प्यायल्याने मेंदूची ताकद वाढते. ज्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. ग्रीन टी मधील असलेल्या पोषकतत्वा मुळे आपल्या मेंदूमधील आक्सिजनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे आपला मेंदू फ्रेश राहून स्मरणशक्ती वाढते. अनेक मानसशास्त्रज्ञांनुसार विसराळूपणाच्या समस्येवर ग्रीन टी सर्वाधिक फायदेशीर आहे.
११) तणाव दूर करण्यासाठी ग्रीन टी उपयोगी ठरतो
ग्रीन टी प्यायल्याने आपला मूड फ्रेश राहून मेंदूतील पेशींना आराम मिळतो. तसेच ग्रीन टी प्यायल्याने आपल्या मेंदूतून डोपामाइन नावाचे रसायन स्त्रवते, ज्यामुळे आपले मन आनंदी राहते. तसेच कामाचा ताण आणि तणाव दूर होऊन निद्रानाशची समस्या दूर होते.
१२) मधुमेहाला दूर ठेवतो ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये असणारे फ्लेवोनॉयड्स शरिरातील उच्च रक्तदाबाची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करतात. तसेच रक्तातील अतिरिक्त साखरेचे रुपांतर ग्लुकोजमध्ये होऊन आपल्या शरिराला ऊर्जा देण्याचे काम ग्रीन टी करतो. डॉक्टरांच्या मते ‘मधुमेह २’ च्या रुग्णांनी ग्रीन टीचे सेवन करणे हे लाभदायक आहे. म्हणून मधुमेह असणाऱ्या लोकांनी ग्रीन टी सेवन करणे खात्रीलायक फायदेशीर ठरते.
आले खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि नुकसान
१३) संधिवातावर रामबाण ग्रीन टी
जसजसे वय वाढू लागते तसे कित्येक लोक संधिवात आणि गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरे जातात. या समस्या हिवाळ्यात अधिक प्रमाणात बळावतात म्हणून अशावेळी ग्रीन टी चे सेवन केल्याने आपल्याला काही प्रमाणात आराम मिळू शकतो. थोडक्यात काय ग्रीन टी पिल्याने आपण संधिवाताला दूर ठेवू शकतो.
१४) ब्लॅक टी चांगला की ग्रीन टी (Black tea Vs Green Tea)
![]() |
ग्रीन टी कधी प्यावी.ग्रीन टी चे फायदे| Green tea benefits. |
१ कप ब्लॅक टी मध्ये अहवालानुसार जवळपास ५० मिलिग्रॅम कॅफेनचे प्रमाण असते. तर एक कप कॉफीमध्ये ९५ मिलीग्रॅम कॅफेनचे प्रमाण असते. तसेच एक कप ग्रीन टी मध्ये साधारणपणे २० मिलीग्रॅम कॅफेनचे प्रमाण असते. म्हणून ग्रीन टी मध्ये ० कॅलरी असते. ज्यामुळे वेटलॉस होण्यास मदत होते.
.
If you have any doubts, please let me know.