प्रत्येक दिवसाची सुरुवात चहानेच(tea ) करतात. चहाशिवाय कोणाचीही मॉर्निंग गुड होत नाही. चहा(tea) हा एक असा पेय आहे कि ते पिल्याशिवाय कोणाला फ्रेश वाटत नाही. चहा खूप काळापासून चालत आलेला आहे. आणि ते आवर्जून पिणारे खूप लोक आहेत. चहा हा पेय फक्त आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. कित्येक लोक चहाचे एवढे प्रेमी आहेत की ते दिवसाला ४ ते ५ वेळा चहा घेत असतात. सरासरी बघता भारतातील ९०% लोक हे चहाचे प्रेमी आहेत.
चहा हे अतिशय उत्साहवर्धक आणि तरतरी आणणारे पेय
आहे. चहाच्या अनेक औषधी गुणधर्मामुळे त्याचा आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो.
परंतु एका बाजूने असही म्हंटले जाते कि चहाचे अतिसेवन हे फार वाईट असते. त्याचे
नुकसान म्हणजे काय होते कसे होते ते आपण पाहुयात. खरतर चहा म्हणजे चहा वनस्पतीची
पाने असतात. चहाची पाने हि ९ ते १५ मीटर उंचीच्या
झुडपावर वाढत असलेली ही पाने. चहाच्या झुडपांची वाढ हि साधारणतः १५० सेमी पेक्षा जास्ती वाढत नाहीत. आहि ही चहाची झुडपे
हिरवीगार असतात. त्या वनस्पतीवरील पुढची दोन दोन पाने खुडून त्याची पावडर करून चहा
तयार केला जातो. या पाने सुगंधित
असतात. भारत, आसाम,
दार्जिलिंग येथे
चहाचे उत्पादन होते. डिसेम्बर ते मार्च या महिन्यादरम्यान चहाचे
उत्पादन सर्वाधिक होते.
चहाचे सुद्धा खूप प्रकार आहेत. तर ते प्रत्येकाच्या आवडीनुसार पित असतात. काहीजण साखरेचा
चहा पितात तर काहीजण गुळाचा चहा पितात. काहीजण काळा चहा पितात तर काहीजण दुधाचा.
काही मसाला चहा घेतात. प्रत्येकाची चॉईस असते. काही लोक तर
कॉफी पिणे लाईक करतात. तर अशी सर्वांचीच दिवसाची सुरुवात करतात. काळा चहा(black tea) हा आपल्या शरीराला ऊर्जा मिळून देते. शेतात
काम करणारी लोक हे कोरा चहा पिणे जास्त पसंत करतात.
चहा हा
आपल्या लाईफचा एक असा पार्ट झालाय कि आपण त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. एक दिवस
चहा नाही घेतला तर तो दिवसच नाही उजाडला असा होतो. खरतर मलाही चहा आवडतेच. एकदिवस जरी चहा नाही घेतला तर तो दिवस तिथेच थांबल्यासारखा वाटतो.
माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा चहाचे लव्हर असणार म्हणून तर तुमच्यासोबत चहाबद्दल
गप्पा मारायची संधी मिळवली या
आर्टिकलद्वारे. तर पाहुयात आपण थोडसं चहाबद्दल...
Table of contents
दुधाचा चहा (Milk Tea)-
![]() |
चहा पिण्याचे फायदे आणि तोटे |
१. आपल्या शरीरातील अँटीऑक्सिडेन्ट इम्यून सिस्टीम
व्यवस्थित ठेवण्यासाठी चहा हा फायदेशीर ठरतो.
२. चहा हा शरीरवाढीचे नुकसान थांबवतो.
३. चहामध्ये अँटीएजिंग असतात जे आपल्या शरीरातील अँटी बॅक्टिरिअल क्षमता
प्रदान करतो.
४. चहामध्ये सामाविस्ट असलेला फ्लोराईड आपल्या हाडांना
मजबूत ठेवण्यास मदत करतो. व फ्लोराइडमुळे दातांना कीड लागण्यापासून बचाव करतो.
५. चहा पिल्यामुळे आपले वाढते वय दिसून येत नाही.
६. चहामध्ये टॅनिन आणि कॅफेन हे घटक आपल्या शरीराला
स्पुर्ती प्रदान करतात.
७. चहामधील अमिनो ऍसिड मुळे आपले डोके शांत राहायला मदत होते.
८. ज्या व्यक्तीला डोळे आले असतील तर त्या
व्यक्तींनी चहाच्या पानाचा काढा करून त्याचे दोन थेंब डोळ्यामध्ये सोडल्याने
डोळ्यांना आराम मिळतो.
९. घसा दुखत
असल्यास आपण चहाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास घशाला चांगला आराम
मिळतो.
१०. पोटदुखीवर
सुद्धा चहा रामबाण आहे. ऋतुमानानुसार झालेली सर्दी खोकला चहाने बरा होतो.
१२. चहा हे उत्तम हेअर टॉनिक म्हणून काम करतो. नियमित चहा
च्या सेवनाने केस सॉफ्ट आणि शायनी होतात.
काळा चहा (Black Tea) -
![]() |
चहा पिण्याचे फायदे आणि तोटे |
१. काळा चहा किंवा कोरा चहा हा आपल्या शरीरात ऊर्जा प्रदान
करतो.
२. अतिशय कष्टाळू लोक नेहमी कोरा चहा पिणे पसंत करतात. का
तर त्यांना एनर्जी त्यातून मिळते.
३. कोरा चहा हा रक्तदाब नियंत्रित करतो. तसेच हृदयविकार
असणारे लोक नियमित सेवन करत असल्यास त्यांचा रक्तप्रवाह सुधारतो.
४. अतिसार किंवा उलट्या होत असल्यास कोरा चहात लिंबू
पिळून पिल्याने लवकर आराम
मिळतो.
५. कर्करोग्यांसाठी कोरा चहा गुणकारी ठरतो.
६. कोऱ्या चहामधील अँटिऑक्सिडेंट्स, फायटोकेमिकल्स, फ्लोराइड्स
टेनिन्स सारखे घटक आपल्या शरीराला फायदेशीर असतात.
७. कोरा चहा हा अन्नपचनासाठी उत्तम असतो .
८. कोऱ्या चहात साखरेचे प्रमाण कमी करून आपण मधुमेह
आटोक्यात आणू शकतो.
९. काळा चहा पिल्यामुळे दाहक आतड्यासंबंधित आजार बरे होतात.
१०. काळा चहा पिल्यामुळे तणावमुक्त वाटते.
गुळाचा चहा (Jaggery tea) -
![]() |
चहा पिण्याचे फायदे आणि तोटे |
१. दररोज गुळाचे सेवन करणे खूपच फायदेशीर आहे. तर गुळाचा
चहा प्यायला काय हरकत आहे. तुम्ही गुळाचे सेवन करत नसल्यास गुळाचा चहा अवश्य घेऊ
शकता.
२. गुळाचा चहा पिणे हे अमृतासमानच आहे. थंडीच्या दिवसात
गुळाचा चहा प्यायल्याने बरेच फायदे होतात.
३. गुळ हे अनेक रोगांवर औषधापेक्षाही उत्तम कामगिरी पार
पाडतो.
४. ज्या व्यक्तीमध्ये रक्ताची कमतरता आहे त्या व्यक्तींनी
गुळाचा चहा पिणे लाभकारक ठरेल.
५. गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते पण त्याचे गुणधर्म
हे गरम आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात गुळाचा चहा उत्तम ठरेल.
६. गुळाचा चहा हा शरीरातील मॅटोबॉलिजम वाढवतो.
७. गुळाच्या चहामुळे आपल्या छातीतील कफ नाहीसा होतो.
८. यामधील फायटोकेमिकल्स, अँटीएजिंग, टेनिन्स, फ्लोराइड्स हे
घटक आपल्या शरीराला गुणकारक ठरतात.
तुळशीचा चहा (Tulshi Tea) -
![]() |
चहा पिण्याचे फायदे आणि तोटे |
१. नियमित तुळशीचा चहा प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत
होते.
२. तुळशीच्या चहामुळे सर्दीखोकल्यासारखे आजरापासून दूर राहू
शकतो.
३. तुळशीचा चहा प्यायल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहते.
४. तुळशीच्या चहामुळे डोळ्यांच्या तक्रारी नाहीसे होतात.
५. तुळशीच्या चहामध्ये अँटीबॅक्टरील गुणधर्म असते जे दमा
टाळण्यास मदत होते.
६. तुळशीचा चहा हा स्किन सॉफ्ट शायनी आणि हेल्दी बनवतो.
७. तुळशीच्या चहामध्ये अँटीबॅक्टरीयल गुणधर्म असतात त्यामुळे शरीरात इंफेक्शन होत नाही.
८.तुळशीच्या चहामध्ये अँटिइम्पलिमेन्ट्री गुणधर्म
असल्यामुळे शरीराचे जॉईंट पेन कमी करण्यास मदत होते.
९. तुळशीच्या चहामधील फ्लेवोनाइड्स हे कॅन्सर आजार टाळण्यास
फायदेशीर ठरतो.
१०.तुळशीचा चहा प्यायल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत चालू राहते.
मसाला चहा (Masala Tea) -
![]() |
चहा पिण्याचे फायदे आणि तोटे |
चहाच्या अनेक
प्रकारामधील मसाला चहा हा एक मस्त आणि चुस्कीदार चहा आहे. नुसतं मसाल्याचा सुगंध
दरवळला कि चहा कधी पिऊ असा होतो. असा चुस्कीदार आणि तंदुरुत चहा म्हणजे मसाला चहा.
चहामध्ये अशा निवडक मसाले घालून हा चहा बनवला जातो. आणि ते आपल्या आरोग्यासाठी
खूपच गुणकारी असतो. मसाला चहा बनवण्यासाठी आपल्याला जे मसाले लागतात ते आपल्या घरी
सहजरित्या उपलब्द असतात. त्यात पहिला मसाला म्हणजे वेलची, सुंठ, दालचिनी, काळीमिरी, लवंग, तुळस, गवती चहाची पाने इत्यादींचा समावेश होतो.
तर आपण त्याचे
फायदे पाहुयात...
१. मसाला चहा हा प्यायला खूपच टेस्टी आणि सुगंधित असतो.
२. मसाला चहामध्ये दालचिनीचा (cinnamon
) समावेश केल्यामुळे कफाचा आणि
खोकल्याचा त्रास कमी होतो.
३. तुळस या वनस्पतीला खूप पूर्वीपासून आयुर्वेदामध्ये महत्व
आहे. तर तुळशीच्या चहामुळे मासिक पाळीत होणार त्रास हा कमी होतो. व
आपल्याला आराम मिळतो.
४. चहाच्या मसाल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेन्ट
असते जे आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती
वाढवण्यास मदत करतात.
५. मसाला चहामुळे आपली डोकेदुखी गायब होते.
६. मसाला चहामुळे आपल्याशरीरातील बॅड बॅक्टरीया दूर करून
शरीर फिट राहण्यास मदत होते.
७. पोटाचे आजार मसाला चहाच्या सेवनाने बरे होतात.
रोज नाही तर आठवड्यातून दोनदा तरी मसाला चहा पिणे आपल्या
सर्वांसाठी उत्तम फादेशीर राहील.
उपाशीपोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम -
१. उपाशीपोटी चहा पिल्याने तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते.
२. असे म्हणतात कि सकाळी चहा पिल्यामुळे तरतरी येते तर तसे
वाटत असले तरी रिकाम्या पोटी चहा पिल्यामुळे दिवसभर थकवा व चिडचिड जाणवते.
चहामध्ये टॅनिन भरपूर प्रमाणात असते तर ते रिकाम्यापोटी चहा
पिल्यामुळे कधीकधी छातीत मळमळणे उलटी होणे याची शक्यता असते..
३. उपाशी पोटी चहा पिल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण दिल्यासारखे होते.
अतिचहा पिण्याचे दुष्परिणाम -
१. चहाचे अतिसेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढते.
२. चहाच्या अतिसेवनाने निद्रानाश होते.
३. चहाच्या अतिसेवनाने ब्लडप्रेशर व शुगरलेवल वाढते.
४. चहाच्या अतिसेवनाने शरीरातील आतड्यांवर परिणाम होतो.
५. अति चहाच्या सेवनाने आपल्याला विविध आजारांना तोंड
द्यावे लागते.
६. अति चहा पिल्यामुळे हृदयसंबधित आजार उद्भवू शकतात.
चहा पिण्याची योग्य वेळ -
१. सकाळी हेल्दी नाश्ता घेऊन चहाचे सेवन करू शकता.
२. दिवसातून दोनदा चहाचे सेवन करू शकता.
३. जेवण झाल्यानंतर चहाचे सेवन करणे उत्तम राहील. जेणेकरून
अन्नपचनाला मदत होईल.
४.काहीवेळेस चहाची चुस्की घेतली तरी उत्तम राहील.
५.कधी कधी ब्रेड किंवा टोस्टसोबत चहा घेऊ शकता.
If you have any doubts, please let me know.