शब्दांचा चाकरी झालो
किती भले शब्दांना जपु
त्यातच सगळे सर्वस्व ओतु
मनातून खून झाला चिंतनाचा
परंतु जन्म झाला शब्दांचा
किती-किती प्रेम करू
शब्द हाच माझा धनी
करतो नित्य त्याची सेवा
परंतु बनवतो मला गुलाम
मी शब्दांचा गुलाम
लेखनीचा हमाल
हे ओझे वाहतच राहीन
हेच जगणे पुन्हा-पुन्हा मागत राहीन
कल्पनांना फुले बनवून
हदयातल्या धाग्यात ओवून
शब्दांना अर्पण करेन आणि
जन्मोजन्मी शब्दांचा गुलाम राहीन.
If you have any doubts, please let me know.