चारोळी
सखे हा जीवनाचा पहाड
कसा पार करू तुझ्याविना
दिलीस प्रेमाची सावली
न हलविता हदयाची तार
तुझे अश्रु हे माझे प्राण
हे महित असताना सुद्धा
वर्तुळातील दोन अक्षरांचा
विचार केली नाहीस प्रेमाचा
मी निरागस फुलपाखरु
तु गुलाब, मोगरा न उमललीस
तर घेऊ कोठून
प्रेमाचा रसास्वाद
पहाड म्हणून विश्रांती घेणार नाही
तुझ माझ्यावर प्रेम आहे जिवापाड
ठेच लागली तरी
सांगायला विसरणार नाही.
समजले प्रेम म्हणजे काय
तुझ्या वीना मी अपूर्ण आहे
नदीला वाहता येत नसेल तर
तिला नदी म्हणता येईल काय
समजले होते पण उमजले नव्हते
तुच माझ्या हदयातील कल्पकता
किती-किती विचारु तुला
पानावलेल्या नेत्रातील अश्रुंची सुचना
तुझ्यातले माझ्यातले
प्रेम आहे कंसातले
तुझ्याविना कंसाबाहेर जगणे
मला मरणाच्या खुशीतले
खळखळणाऱ्या झऱ्याप्रमाणे हसतेस
गरजणाऱ्या मेघाप्रमाणे बरसतेस
हरिणीवाने तुरुतुरु धावतेस
हदयातील भावनांना हेरावतेस का
कधी सिंहाप्रमाणे गुरगुरतेस
कधी गजाप्रमाणे डुलडुलतेस
कधी मुनिप्रमाणे स्थिरावतेस
माझ्या भावनांना तुच्छ लेखतेस का
समुद्राला भरती-ओहोटी यावी
हदयातील भावनांना कल्पकता यावी
मळयात गुलाबांचा बहार यावा
हदयात तुझाच चेहरा मुद्रित व्हावा
इथे फुल आहे जाईचे
त्यात प्रेम आहे सुगंधाचे
ईथे रूप आहे स्वप्नसुंदरीचे
तुझ्यासंगे नशेत जगण्याचे.
If you have any doubts, please let me know.