भिजवलेले हरभरा खाण्याचे 7 फायदे ! कुणी हरभरा खाऊ नये ? जाणून घ्या.

 

भिजवलेले हरभरा खाण्याचे 7 फायदे ! कुणी हरभरा खाऊ नये ? जाणून घ्या.


 

भिजवलेले हरभरा खाण्याचे 7 फायदे ! कुणी हरभरा खाऊ नये ? जाणून घ्या.
भिजवलेले हरभरा खाण्याचे 7 फायदे

भिजवलेले हरभरे(Soaked Gram) खूपच पौष्टीक असतात. आपण सकाळच्या

 ब्रेकफास्ट मध्ये भिजवलेले हरभरे सामाविष्ट केले तर फारच उत्तम ठरेल.

 दररोज मूठभर भिजलेले हरभरे खाऊन आपण खूपच तंदुरुस्त राहू शकतो.

 आपल्या शरीराच्या संबधित असलेले कोणतेही छोटे मोठे आजार दूर होण्यास

 मदत होते.  भिजलेल्या हरभऱ्यामध्ये प्रोटिन्स,  कार्बोहाड्रेट,  फॅट, फायबर,  लोह,

 कॅल्शियम,  व्हिटॅमिन्स आढळतात. भिजलेले हरभरे खाल्ल्याने आपल्या

 शरीरातील एनर्जी वाढते. याचे अनेक फायदे आहेत.  पुरुषांसाठी तर खूपच

 फायदेशीर असते. यासोबतच इम्युनिटी(Immunitiy Power) सुद्धा वाढवण्यास

 मदत करते.

           भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये  हरभऱ्याचे असाधारण महत्व आहे.

हरभऱ्याची डाळ व त्यापासून केलेले बेसन याचा समावेश आवर्जून करतात.

 आपल्या गावाकडची पिटलं  भाकरी असो कि प्रत्येक सणाची पुरणपोळी

 हरभरा डाळीशिवाय नाहीच. विविध पदार्थामध्ये बेसनचा समावेश करतात.

 हरभरा पासून चणे,  फुटाणे सुद्धा केले जातात. तेही लोक आवर्जून आवडीने

 खातात. त्यापासूनही आपल्याला एनर्जी(Energy) मिळते. टेस्ट पण भारीच

 असते.

             हरभऱ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असून त्यामध्ये फायबर

 फॉलीक ऍसिडचा चांगला स्रोत असतो. यात प्रामुख्याने मॅगनीज,  जस्त,  तांबे

 यांचे मुबलक प्रमाण असून लोह, सोडिअम, सेलेनियम अशी पोषकद्रव्येही

 आढळतात. या लेखात आपण भिजवलेले हरभरे,  भाजलेले चणे,  हरभरा डाळ

 यांचे फायदे आणि नुकसान बघणार आहोत.


   भिजलेल्या हरभरा(Soaked Gram) डाळीचे फायदे पुढीलप्रमाणे -


 Table of contents 

    १. इम्युनिटी स्ट्रॉंग होते -

२. वजन आटोक्यात ठेवते(lose weight)-

३. पचनक्रिया सुधारते (Improves digestive health)-

४. एनर्जी(Energy) वाढवते -

५. पुरुषांसाठी खूपच फायदेशीर -

६. ब्लड शुगर नियंत्रित राहते-

७. एनर्जी बुस्टर(Energy Booster) म्हणून उत्तम-

   भिजलेले हरभरे कसे खावे -

   हरभरा डाळीचे सेवनकोणी करू नये -

   


१. इम्युनिटी स्ट्रॉंग होते -

भिजवलेले हरभरा खाण्याचे 7 फायदे ! कुणी हरभरा खाऊ नये ? जाणून घ्या.
भिजवलेले हरभरा खाण्याचे 7 फायदे


 भिजलेल्या हरभऱ्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. जर तुम्ही वारंवार

 आजारी पडत असाल तर तुम्ही भिजवलेले हरभरे खाण्यास सुरुवात करू

 शकता. भिजवलेल्या हरभऱ्यपासून आपल्या शरीराला जास्त पोषण मिळते.

 हरभऱ्यामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात. यासोबतच फॉस्फोरस

 आणि क्लोरोफिल सारखे मिनरल्स असतात. यात काळ्या रंगाचे हरभरे

 असतील तर उत्तमच. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढून आजार दूर

 ठेवण्यास मदत होते. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज भिजलेले

 हरभरे खाणे उत्तम राहील.


२. वजन आटोक्यात ठेवते(lose weight)-

 

भिजवलेले हरभरा खाण्याचे 7 फायदे ! कुणी हरभरा खाऊ नये ? जाणून घ्या.
भिजवलेले हरभरा खाण्याचे 7 फायदे

        भिजवलेले हरभरे आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

 ठरते. यामध्ये हायप्रोटीन्स असतात जे आपले वजन नियंत्रित ठेवते.

 यासोबतच यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हे एक पोषक तत्व आहे हे मोठ्या

 प्रमाणात असते. यामुळे आपल्याला सारखी भूक लागत नाही. सतत

 खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.

 

३. पचनक्रिया सुधारते (Improves digestive health)-


         भिजवलेले हरभरे हि पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करतात.

 यामध्ये फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. फायबर हे प्रामुख्याने

 अन्न पचवण्यास मदत करण्याचे कार्य करते. यामुळे पचनक्रिया मजबूत

 करते. आणि पोटाची समस्या दूर करते.

 

Read more केळी खाण्याचे फायदेपचनापासून ते त्वचेपर्यंत सर्व समस्यांवर गुणकारी



४. एनर्जी(Energy) वाढवते -

         जर आपल्याला सतत थकवा शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवत

 असेल तर भिजलेले हरभरे उत्तम फायदेशीर ठरू शकतात. यासाठी तुम्ही

 भिजलेल्या हरभऱ्यामध्ये लिंबूचा रस, आलं लसूण,  मीठ, काळी मिरी पुड आणि

 हळद मिक्स करून खाऊ शकता. असे नियमित खाल्ल्याने तुमच्या शरीरास

 ऊर्जा मिळते. आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. 


५. पुरुषांसाठी खूपच फायदेशीर -

          पुरुषांच्या अशक्तपणाशी संबधित समस्या दूर करण्यासाठी

 भिजलेले हरभरे खूपच फायदेशीर ठरतात. यासाठी रोज रात्री हरभरा भिजत

 घालून ते सकाळी  उपाशीपोटी खावे. ते पुरुषांसाठी उत्तम राहील. दिवसभर

 त्यांना उत्साही वाटेल.     

 

६. ब्लड शुगर नियंत्रित राहते-

        शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी भिजवलेले हरभरे उत्तम

 फायदेशीर ठरतात. हरभरा फायबर आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांनी

 समृद्ध असल्याने या आजाराचा धोका टळतो.

 
७. एनर्जी बुस्टर(Energy Booster) म्हणून उत्तम-

       भिजलेले हरभरा खाल्ल्यामुळे शरीरात ऊर्जाशक्ती वाढवण्यास मदत

 करते. म्हणूनच ते घोड्यांना देखील खायला दिले जाते. हरभऱ्यात प्रोटीन्सचे

 प्रमाण मुबलक असते त्यामुळे मांसपेशीच्या   व हाडांच्या मजबुतीसाठी

 खूपच उपयुक्त ठरते.


  भिजलेले हरभरे कसे खावे -       

      एक वाटी हरभरा स्वछ धुवून रात्रभर भिजत ठेऊन सकाळी उठल्यावर

 उपाशीपोटी खाऊ शकता. हरभरा मधासोबत घेऊ शकता किंवा आपल्या

 आवडीप्रमाणे मसाले वापरू शकता. भिजलेल्या हरभऱ्याचे पाणी ओतण्याऐवजी

 पिऊ शकता तेही आरोग्याला चांगलेच असते. आपण आपल्या आहारात

 आठवड्यातून एकदातरी मोड आलेल्या हरभऱ्याची उसळ सुद्धा खाऊ शकता.

 यात प्रोटिन्स व फायबर भरपूर प्रमाणात असतात.

 

 हरभरा डाळीचे सेवन कोणी करू नये -

     हरभरा डाळ हि पचनास जड असून ती किंचित उष्ण  असते.

 आयुर्वेदानुसार हरभरा डाळ ही वातदोष वाढवणारी आहे जे वातदोषाचे रुग्ण

 आहेत त्यांनी हरभऱ्याचे सेवन करू नये. ज्यांची पचनशक्ती मंद आहे त्यांनी

 ही हरभऱ्याचे सेवन कमी प्रमाणात करावे. अपचन,  गॅस इत्यादींचा त्रास

 होणाऱ्या व्यक्तींनी हरभरा डाळीच्या पिठापासूनचे पदार्थ टाळावे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.