आंब्याचे फायदे आणि दुष्परिणाम: स्वास्थ्यासाठी उपयुक्त, परंतु अतिशय खाण्याचे दुष्परिणाम

 

       आंब्याचे फायदे आणि दुष्परिणाम: स्वास्थ्यासाठी उपयुक्त, परंतु अतिशय खाण्याचे दुष्परिणाम


             लहानांपासून ते अगदी मोठ्या वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वात आवडीचा

 आणि खाण्यायोग्य फळ म्हणजे ''आंबा''. 


"आंब्याचे फायदे आणि दुष्परिणाम: स्वास्थ्यासाठी उपयुक्त, परंतु अतिशय खाण्याचे दुष्परिणाम"
आंब्याचे फायदे आणि दुष्परिणाम


         सगळ्यांनाच आवडतो असा फळ आहे आंबा.  आंब्याची चव वर्षभर

 चाखण्यासाठी आपण त्याचे लोणचे,  मुरंबा बनवून ठेवतो.  उन्हाळ्याचा सिझन

 सुरु होताच सर्वांनाच आंब्याची चाहूल लागते. आंब्याचा आधी कैरी खायला

 मिळते कैरीपासून आपण पन्ह करून पिऊ शकतो, गुळ आंबा बनवू शकतो.

 कैरी खायची पण वेगळीच मजा असते. असा हा उन्हाळा कितीही

 कंटाळवाणा,  त्रासदायक वाटलं तरी आंब्यासाठी तो हवाहवासा वाटतो.

 प्रत्येकाची उन्हाळ्याच्या सुट्टीतली आंब्याची एक तरी आठवण नक्कीच

 असते. उन्हाळ्यात आंबा खाल्ल्याने एक आंनद मिळतो एनर्जी मिळते. अशा

 आंब्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद आपण घेऊ शकतो. मँगो

 शेक, पन्हे आमरस, कैरीची चटणी इत्यादी.

         सर्व फळांचा राजा आंबा म्हणून ओळखला जातो. अतिशय गोड़ मधुर व

 परिपकव फळ आहे. आंबा खाल्ल्यावर मन कस तृप्त होतं. आपल्या

 भारतामध्ये तर आंब्याचं जास्तीत जास्त उत्पादन होते. महारष्ट्रातील हापूस,

पायरी, तोतापुरी गुजरातमधील केशरबालसाडी उत्तरभारतात तर बनारसी,

किशनभोग, लंगडा तर दक्षिण भारतात केसरीया,  शेवप्पा अशा अनेक

 आंब्याच्या जाती प्रसिद्ध आहेत. प्रत्येकजण आवडीने आंबा खातो. आंब्याच्या

 फोडी करून खातात आणि पिकलेला आंबा चोखून खातात. आंब्यापासून सॉस,

करी मँगो जूस,  आमरस इत्यादीचा पुरेपूर आनंद घेतात.

"आंब्याचे फायदे आणि दुष्परिणाम: स्वास्थ्यासाठी उपयुक्त, परंतु अतिशय खाण्याचे दुष्परिणाम"
आंब्याचे फायदे आणि दुष्परिणाम

   

ReReadmore केळी खाण्याचे फायदे; पचनापासून ते त्वचेपर्यंत

      सर्व समस्यांवर गुणकारी

 


     आंबा हे आरोग्यदायी आहे.  आंबा खायच्या ओढीसोबतच आपण हे हि

 लक्षात घ्यायला हवे कि आंबा कोणी खावं कस खावं किती खावं याचेही

 प्रमाण माहिती असणे गरजेचे आहे.  त्याचे अनेक फायदे असले तरी

 अतिखाण्यामुळे नुकसानही होऊ शकते हेही लक्षात घ्यायला हवे. तर जाणून

 घेऊयात आंब्याचे फायदे आणि तोटे ...

 

आंबा खाण्याचे फायदे -


१. आंब्यात व्हिटॅमिन ए, आयर्न,  कॉपर आणि पोटॅशिअम सारखे अनेक पोषक

 घटक असतात. त्यामुळे उन्हाळ्यात आंबे खाणे फायदेशीर ठरते.


२.आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त

 असणारे घटक असल्याने हे फळ खाणे योग्य आहे.


३. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकाने शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत

 होते.


४. आंब्यात शर्करा असल्यामुळे शरीराला जास्त ऊर्जाशक्ती मिळते. उन्हामुळे

 थकल्यासारखे वाटत असले तरी आंबा हल्ल्यामुळे खूपच एनर्जीटिक आणि

 फ्रेश वाटेल.


५. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकामुळे आपल्या शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू

 मजबूत होण्यास मदत होतात.


६. व्हिटॅमिन बी ६ मुळे रक्तातील होमोसिस्टीनचे प्रमाण संतुलित राहते. व

 हृदयविकाराचा धोका कमी होतो.


७. उन्हाळ्यामुळे ड्राय होणारी स्किन नियमित आंबा खाल्ल्यामुळे व्यवथित

 राहते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करून तेजस्वी ठेवते.


८. आंब्यात फायबर्स ही मुबलक प्रमाणात असल्याने नियमित पोट साफ

 होण्यासाठी मदत होते.


९.आंब्याच्या कोईमधून निघालेले तेल हे संधिवातावर रामबाण ठरते.  


 १०. आंब्याची कोइ दह्यात वाटून दिल्यास आमातिसार दूर होतो तसेच

 टाकात वाटून दिल्यास रक्तातिसार दूर होतो.


११. दुर्बल व कमजोर व्यक्तींनी प्रथम गाईचे दूध प्यावे मगच रसदार आंबा

 चाखून खावा.


    आंबा खाण्याचे तोटे -


१.एका आंब्यात जवळपास १५० कॅलरीज असतात. त्यामुळे आंब्याच्या

 अतिसेवनाने कॅलरीज वाढून  आपले वजन वाढू शकते.


२. कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आजार वाढू शकतो.


३. ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे त्या लोकांनी आंब्याचे सेवन कमी

 प्रमाणात करावे.


४. आंब्याचे अधिक सेवन केल्याने मधुमेह मोट्या प्रमाणावर वाढू शकतो.


५. आंब्याला पिकवण्यासाठी अनेकदा आंब्यावर कॅल्शियम कार्बोनेटचा मारा

 केला जातो. या केमिकलमुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.


६. आंबा हे एक गरम फळ आहे. त्यामुळे त्याच्या अतिसेवनाने चेहऱ्यावर

 किंवा शरीरावर मुरुमे,  पुरळ येऊ शकतात.


७. आंबा कैरी हे चवीला आंबट व तुरट आहे. त्यामुळे हे वायुकारक व

 पित्तकारक  आहे. त्याच्या अतिसेवनाने आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो.


८. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी कैरीचे व आंब्याचे अतिसेवन टाळावे.

 

 m Read more डाळिंब खाण्याचे फायदे जाणून घ्या मराठीमध्ये |

        Pomegranate Benefits

 

 

 आंब्याचे सेवन कसे व किती करावे -


१. पिकलेला ताजा आंबा खाल्लेत तर अतिउत्तमच.


२. आंबा आपण ब्रेकफास्ट मध्ये खाऊ शकतो,  दुपारच्या जेवणानंतर खाऊ

 शकता. स्नॅक्समध्येही खाऊ शकता.


३. एकेदिवशी एक किंवा दोन आंबे खाणे योग्य आहे.


४. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्या व्यक्तींनी कैरीचा आंब्याचा मुरंबा  करून

 खाऊ शकता.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.